रसायन आणि खते मंत्रालय

सरकारने  ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित केल्यावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या किंमती  54 टक्क्यांपर्यंत  खाली आल्या


ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्ससाठी ट्रेड मार्जिनच्या  मर्यादेमुळे ग्राहकांची बचत झाली

9 जून 2021 पासून सुधारित एमआरपी लागू

Posted On: 11 JUN 2021 7:41PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरण (एनपीपीए) च्या दिनांक 3 जून 2021 च्या अधिसूचनेनुसार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्ससाठी वितरकांच्या किमतीवर  (पीटीडी) ट्रेड मार्जिन मर्यादा 70 टक्के ठेवण्यात आली आहे. त्यानुसार  ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सच्या एकूण 104 उत्पादक / आयातदारांनी 252 उत्पादने / ब्रँडसाठी सुधारित कमाल किरकोळ किंमत (एमआरपी)  सादर केली आहे .

70  उत्पादने / ब्रँडमध्ये किमतीत   54 % पर्यंत  घसरण नोंदवण्यात आली असून एमआरपीमध्ये  प्रति युनिट 54,337 रुपये घट झाली आहे. तसेच  58 ब्रँडच्या किंमती 25% पर्यंत आणि 11 ब्रँड्सच्या  26 ते 50 टक्क्यांनी  कमी झाल्याची नोंद आहे. नोंद झालेल्या 252 उत्पादने / ब्रँडपैकी देशांतर्गत उत्पादकांच्या 18 उत्पादने / ब्रँडच्या किंमतींमध्ये कोणतीही घट दिसून आली नाही. अशा प्रकारे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्ससाठी ट्रेड मार्जिन सुसूत्रीकरणामुळे  (टीएमआर) आयात उत्पादनांमध्ये अवास्तव नफ्याचे मार्जिन बंद झाल्यामुळे ग्राहकांची बचत होणार आहे.

एमआरपीमधील कमाल घट खालील श्रेणींमध्ये दिसून आली आहे.

पोर्टेबल -5 एलपीएम (80 पैकी 19 उत्पादने)

पोर्टेबल -10 एलपीएम (32 पैकी 7 उत्पादने)

स्टेशनरी -5 एलपीएम (46 पैकी 19 उत्पादने)

स्टेशनरी -10 एलपीएम (27 पैकी 13 उत्पादने)

सर्व ब्रॅंड्सवर  9 जून 2021 पासून  सुधारित एमआरपी लागू होईल आणि काटेकोर देखरेखीसाठी आणि अंमलबजावणीसाठी राज्य औषध नियंत्रकांना त्याबाबत माहिती सामायिक केली गेली आहे. संबंधित सूचना एनपीपीएच्या संकेतस्थळावर  (www.nppa.gov.in) उपलब्ध आहेत. उपलब्धतेवर देखरेख  ठेवण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या उत्पादक / आयातदारांना मासिक साठ्याबाबत तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726326) Visitor Counter : 176