ऊर्जा मंत्रालय
2020-21 आर्थिक वर्षात एनएचपीसीने 3,233 कोटी रुपये इतका सर्वाधिक नफा कमवला
Posted On:
11 JUN 2021 12:33PM by PIB Mumbai
एनएचपीसी लिमिटेड, या भारताच्या प्रमुख जलविद्युत कंपनी आणि ऊर्जा मंत्रालयांतर्गत ‘मिनी रत्न’ श्रेणी --I उद्योगाने आर्थिक वर्ष 2020-21 साठी लेखा परीक्षणोत्तर आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. संचालक मंडळाने काल झालेल्या ई-बैठकीत आर्थिक वर्ष 20-21 साठी लेखा परीक्षणोत्तर वित्तीय निकालांना मंजुरी दिली.
गेल्या आर्थिक वर्षातील 3,007.17 कोटी रुपयांच्या तुलनेत एनएचपीसीने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 3,233.37 कोटी रुपयांचा सर्वाधिक निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या व्यवहारातून मिळालेला महसूल 8,506.58 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षात 8,735.15 कोटी रुपये होता. 2020-21 वर्षासाठी एकत्रित निव्वळ नफा 3,582.13 कोटी रुपये असून 2019-20. मध्ये तो 3,344.91 कोटी रुपये होता.
सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीनंतरही एनएचपीसी वीज निर्मिती केंद्रांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 24471 दशलक्ष युनिट्स (एमयू) इतकी वीजनिर्मिती केली.
संचालक मंडळाने मार्च 2021 मध्ये कंपनीने आधीच दिलेल्या प्रति समभाग 1.25/- रुपयाच्या अंतरिम लाभांशाव्यतिरिक्त आर्थिक वर्ष 2020-21साठी प्रति समभाग 35 पैसे अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. एनएचपीसीचे सध्या सुमारे सात लाख भागधारक आहेत.
ए.के. सिंग, सीएमडी, एनएचपीसी म्हणाले की सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीतही एनएचपीसी जलविद्युत विकासाच्या मुख्य व्यवसायासह सौर आणि पवन उर्जा विस्ताराची योजना आखत आहे.
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726185)
Visitor Counter : 201