अर्थ मंत्रालय

महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 17 राज्यांना 9,871 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत


महसूली तूट भरून काढण्यासाठीच्या अनुदानापोटी गेल्या 3 महिन्यांत राज्यांना एकूण 29,613 कोटी रुपयांचे वितरण झाले

Posted On: 09 JUN 2021 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2021

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 17 राज्यांना वर्ष 2021-22 साठीच्या पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदानापोटी 9,871 कोटी रुपयांचा तिसरा मासिक हप्ता मंगळवारी वितरीत केला.

या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणानंतर विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत राज्यांना एकूण 29,613 कोटी रुपयांचे पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान देण्यात आले आहे. मंगळवारी देण्यात आलेला हप्ता आणि आतापर्यंत वर्ष 2021-22 मध्ये वितरीत झालेल्या एकूण पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदानाचा राज्य-निहाय तपशील सोबत जोडला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या 275 व्या कलमातील तरतुदीनुसार केंद्र सरकार राज्य सरकारांना पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान देते. राज्यांच्या महसुली खात्यातील तूट भरून काढण्यासाठी वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना अनुदानाचा मासिक हप्ता वितरीत केला जातो. 15 व्या वित्त आयोगाने देशातील 17 राज्यांना पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान देण्याची शिफारस केली आहे.

आंध्रप्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागलँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, आणि पश्चिम बंगाल या राज्यांना पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

राज्याचे महसुली उत्पन्न आणि खर्च यांच्या मूल्यमापनाच्या आधारावर वित्त आयोग हे अनुदान मिळण्यासाठीची राज्यांची पात्रता आणि अनुदानाची रक्कम निश्चित करते. यासाठी आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिव्होल्यूशन मूल्यमापनाची रक्कम देखील आयोगाने विचारात घेतली आहे.

15 व्या वित्त आयोगाने 17 राज्यांना पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदानापोटी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 1,18,452 कोटी रुपये अनुदान देण्याची शिफारस केली आहे. राज्यांना ही रक्कम 12 मासिक हप्त्यांच्या स्वरुपात वितरीत होणार आहे.

पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदानाचे राज्य-निहाय वितरण

S. No.

Name of State

Amount released in June 2021

(3rd   installment)

(Rs. in crore)

Total amount released in 2021-22

(April -June 2021)

(Rs. in crore)

 

Andhra Pradesh

1438.08

4314.24

 

Assam

531.33

1593.99

 

Haryana

11.00

33

 

Himachal Pradesh

854.08

2562.24

 

Karnataka

135.92

407.76

 

Kerala

1657.58

4972.74

 

Manipur

210.33

630.99

 

Meghalaya

106.58

319.74

 

Mizoram

149.17

447.51

 

Nagaland

379.75

1139.25

 

Punjab

840.08

2520.24

 

Rajasthan

823.17

2469.51

 

Sikkim

56.50

169.5

 

Tamil Nadu

183.67

551.01

 

Tripura

378.83

1136.49

 

Uttarakhand

647.67

1943.01

 

West Bengal

1467.25

4401.75

 

Total

9,871.00

29,613.00

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725585) Visitor Counter : 225