PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
08 JUN 2021 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 8 जून 2021
- India reports less than 1 Lakh Daily New Cases after 63 days
- 86,498 new cases reported in last 24 hours; lowest in 66 days
- India's Active Caseload further declines to 13,03,702
- 1,82,282patients recovered during last 24 hours.
- Recovery Rate increases to 94.29%
- Weekly Positivity Rate currently at 5.94%
- Daily positivity rate at 4.62%, less than 10% for 15 consecutive days.
- Testing capacity substantially ramped up–36.8cr tests total conducted
- 23.61 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. यासोबतच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लसींची थेट खरेदी करण्याची सुविधाही केंद्र सरकारने दिली आहे. चाचणी, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविड प्रतिबंधक वर्तन यासह लसीकरण हा देखील सरकारच्या महामारी विरोधातल्या लढ्यातील धोरणाचा अविभाज्य घटक आहे.
कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली आहे.
या धोरणानुसार, कोणत्याही उत्पादकाद्वारे तयार करण्यात आलेल्या केंद्रिय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मंजूर केलेल्या 50 टक्के लसीच्या मात्रा भारत सरकारकडून घेतल्या जातील. पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारांना लसींंच्या या मात्रा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील.
मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 24 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (24,65,44,060) राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत.
वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 23,47,43,489 मात्रा देण्यात आल्या आहेत.(आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार).राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.19 कोटींपेक्षा जास्त (1,19,46,925) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
इतर अपडेटस्
महाराष्ट्र अपडेट्स :-
- म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक (6,339) रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. आतापर्यंत म्यूकोर्मिकोसिसचे 28,252 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी 10,219 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. 10 मार्चनंतरची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. राज्यात बाधितांची संख्या 58,42,000 झाली आहे, तर मृतांचा आकडा 1,00,470 वर पोहोचला आहे. सोमवारी 154 बाधितांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोविड -19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 95.25 टक्के असून मृत्यू दर 1.72 टक्के आहे.
गोवा अपडेट्स:-
- राज्य सरकार गोव्यातील अनलॉकची प्रक्रिया 15 जूननंतरच सुरू करेल, त्याआधी नाही, असे आणि त्याआधीच नव्हे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील (पात्र) लोकसंख्येचे लसीकरण केल्यानंतरच पर्यटन पुन्हा सुरू करण्याबाबत राज्य विचारकरू शकेल, असेही त्यांनी सांगितले. गोव्यात सोमवारी 418 नव्या कोरोनाबाधितांची आणि आणि 13 मृत्यूची नोंद झाली असून, एकूण बाधितांची संख्या 1,59,811 इतकी आणि मृत्यूंची संख्या 2,840 झाली आहे. दिवसभरात 1,162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे गोव्यातील कोरोनातून बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 1,50,574 इतकी झाली आहे. राज्यात 6,397 सक्रिय रुग्ण आहेत. 2,745 नव्या चाचण्या झाल्या असून गोव्यात आतापर्यंत 8,48,687 नमुने तपासण्यात आले.
Important Tweets
***
M.Chopade/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725437)
Visitor Counter : 325