आयुष मंत्रालय

औषधी वृक्षांची लागवड आणि उत्पादनासाठी राष्ट्रीय औषधी वृक्ष मंडळ आणि राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 05 JUN 2021 6:13PM by PIB Mumbai

 

भारतात औषधी वनस्पती आणि वनौषधींची लागवड आणि उत्पादनासाठी एकत्र येऊन संयुक्तरीत्या प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रीय औषधी वृक्ष मंडळ (NMPB) आणि शास्त्रीय तसेच औद्योगिक संशोधन सल्लागार मंडळाची राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्था (CSIR-NBRI) यांच्यात 4 जून रोजी एक सामंजस्य करार झाला.

या करारामुळे NMPB ने निवडलेल्या औषधी वनस्पती आणि वनौषधी यांच्यासाठी दर्जेदार लागवड साहित्य (QPM)  विकसित करण्याची सोय होईल, QPM मध्ये औषधी वनस्पती आणि वनौषधी यांच्या रोपवाटिका तयार करण्यात मदत होईल, अस्तित्वाला धोका निर्माण झालेल्या औषधी वृक्षांच्या जाती तसेच अतिउंचीवरील प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती यांच्यासह  विविध कृषी-हवामान विभागांमध्ये लावण्यास योग्य ठरतील अशा प्रकारच्या झाडांच्या प्रजातींचा विकास, प्रोत्साहन, जतन आणि संवर्धन करता येईल. 

या सहकार्य करारामुळे चांगले व्यावसायिक मूल्य असलेल्या उत्तम औषधी वनस्पतींच्या जातींच्या लागवडीसाठी उपयुक्त घटकांचा संग्रह तसेच जतन आणि रोपवाटिका तसेच बीजकोष किंवा जीनबँक तयार करण्यासाठी राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेला राष्ट्रीय औषधी वृक्ष मंडळ मदत आणि पाठींबा देईल.

औषधी वनस्पतींचे सर्वेक्षण हाती घेतानाच राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्था राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाशी सुसंवाद राखत इच्छित दिशेने काम करेल. राष्ट्रीय औषधी वृक्ष मंडळ आणि राज्य औषधी वनस्पती मंडळासारख्या अंमलबजावणी संस्था यांच्यासह  प्रादेशिक तसेच सुविधा केंद्रे या कराराच्या कार्यकक्षेत एकत्रितपणे काम करतील.

औषधी वनस्पती, आणि पाठींबा धोरण तसेच या वनस्पतींचा व्यापार, निर्यात, संवर्धन तसेच लागवड याविषयीचे सर्व कार्यक्रम यासंबंधीच्या सर्व बाबींमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी  केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळावर आहे.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724740) Visitor Counter : 529