PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
03 JUN 2021 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 3 जून 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात गेल्या 24 तासांत 1,34,154 दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद झाली.
देशात सलग सातव्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या शासनांनी मिळून एकत्रितपणे केलेल्या परीश्रमांमुळे हा परिणाम साध्य झाला आहे.
भारतात सक्रीय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. आज 17,13,413 सक्रीय रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात सक्रिय रूग्णसंख्येत एकूण 80,232 इतकी घसरण झाली. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या एकूण बाधित रुग्णांच्या 6.02% आहे.
दैनंदिन बरे झालेल्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग 21व्या दिवशी अधिक आहे. गेल्या 24 तासांत 2,11,499 जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 77,345 हून अधिक रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
या महामारीची लागण झाल्यापासून, संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,63,90,584 नागरिक कोविड-19 या आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 2,11,499 रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर 92.79%,इतका आहे, जो सातत्याने वाढता कल दर्शवित आहे.
गेल्या 24 तासात एकूण 21,59, 873 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 35.3 कोटी ( 35,37,82,648) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटीच्या दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर सध्या 7.66% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला असून तो आज 6.21% वर आहे. सलग दहा दिवस तो 10% पेक्षा कमी आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात एकूण संख्या 22.10 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 22,10,43,693 लसीच्या मात्रा 31,24,981 सत्रांद्वारे दिल्या गेल्या आहेत.
इतर अपडेट्स :
- देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. यासोबतच राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना लसींची थेट खरेदी करण्याची सुविधाही केंद्र सरकारने दिली आहे. चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड प्रतिबंधक वर्तन यासह लसीकरण हा देखील सरकारच्या महामारी विरोधातल्या लढ्यातील धोरणाचा अविभाज्य घटक आहे.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हैदराबादच्या मेसर्स बायोलॉजिकल-ई-लिमिटेड याच्यांकडे कोविड -19 लसीच्या 30 कोटी मात्रा मिळण्यासाठी आगाऊ व्यवस्था निश्चित केली आहे. मेसर्स बायोलॉजिकल -ई-लिमिटेड, या लसीच्या मात्रांचे ऑगस्ट-डिसेंबर 2021 पासून उत्पादन आणि साठवणूक करणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मेसर्स बायोलॉजिकल-ई ला 1500 कोटी रुपये आगाऊ अदा केले आहेत.
- माहिती प्रसारण मंत्रालयाने आज सर्व खाजगी मनोरंजन वाहिन्यांसाठी (बिगर वृत्तवाहिन्या) राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकांच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. यानुसार वाहिन्यांनी आपल्या कार्यक्रमांदरम्यान, विशेषत: प्राईम टाईममध्ये टिकर किंवा शक्य त्या माध्यमातून हेल्पलाइन क्रमांकांची जनजागृती करायची आहे.
- संपूर्ण भारतभर सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशील्ड लसीच्या मात्रांच्या रवानगीचे केंद्र म्हणून पुणे विमानतळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.12 जानेवारी 2021 पासून 27 मे 2021 पर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 10 कोटीहून अधिक मात्रा , सुमारे 9052 नग (सुमारे 2,89,465 किलोग्राम वजनाच्या) पुणे विमानतळावरून विविध विमानांद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, गोवा, जयपूर, पोर्ट ब्लेअर, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, लखनौ ,चंदीगढ, लेह, करनाल, हैदराबाद, गुवाहाटी, रांची, जम्मू, कोच्ची, देहरादून, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम.यांसारख्या विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्या.
- संपूर्ण सरकार ध्येयाने यावर्षी 16 जानेवारीपासून राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेश प्रभावी लसीकरण मोहिमेसाठी घेत असलेल्या प्रयत्नांना केन्द्र सरकार सहकार्य करत आहे. तामिळनाडूत लसींची कमतरता असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. ते बिनबुडाचे आणि चुकीचे आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :-
ग्रामीण भागातला कोविड-19 चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि राज्यातील गावे कोरोनामुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक स्पर्धा जाहीर केली असून, जी गावे कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यात यशस्वी ठरतील,अशा कोरोनामुक्त गावांना शासनातर्फे बक्षीस दिले जाणार आहे.
कोविड संसर्गामुळे ज्या बालकांच्या पालकांचा बळी गेला आहे, अशा बालकांच्या खात्यात, एकरकमी पाच लाख रुपये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. वयाची 21 वर्षे पूर्ण केल्यावर ही रक्कम त्या मुलाला/मुलीला सुपूर्द केली जाईल. नागपूरमध्ये आता म्युकरमायकोसिस हा दुर्मिळ आजार राहिला नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या आजाराच्या उपचारासाठी, औषधांचा पुरेसा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी असे निर्देश, न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत.
गोवा अपडेट्स:-
गोव्यात बुधावारी कोविड-19 चे 706 नवे रुग्ण आढळले आणि 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गोव्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1,57,275 इतकी झाली असून मृतांचा आकडा 2,693 इतका झाला आहे. आज दिवसभरात 1,711 रुग्ण कोविडमधून बरे झाले असून गोव्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 1,43,742 इतकी झाली आहे. सध्या गोव्यात, 10,840 सक्रीय रुग्ण आहेत.
M.Chopade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724233)
Visitor Counter : 188