ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

2019-20 मधील खरीप विपणन हंगामातील 773.45 लाख मेट्रिक टन भात खरेदीचा उच्चांक मागे टाकत यावर्षी भाताची खरेदी पोहोचली विक्रमी उंचीवर


सरकारी संस्थांनी किमान आधारभूत मूल्याने 7,29,854 मेट्रिक टन  डाळी आणि तेलबियांची केली खरेदी

प्रविष्टि तिथि: 02 JUN 2021 7:17PM by PIB Mumbai

 

देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या गहू उत्पादक राज्यांमध्ये किमान आधारभूत मूल्याने गेल्या हंगामाप्रमाणेच विद्यमान रब्बी विपणन हंगाम 2021-22 मधील गहू खरेदी सुरळीतपणे सुरु आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या 363.61 मेट्रिक टन गहू खरेदीच्या तुलनेत  आतापर्यंत (1 जून 2021 पर्यंत) 409.80 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त  गव्हाची खरेदी झाली आहे (हा आतापर्यंतचा गहू खरेदीचा उच्चांक असून याआधी 2020-21 च्या रब्बी हंगामात 389.92 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली होती)

 

तसेच, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, 2020-21चा खरीप विपणन हंगाम, वर्ष 2021 चा रबी विपणन हंगाम आणि 2021 चा उन्हाळी हंगाम यातील  107.81 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीकरिता मूल्याधारित योजनेनुसार तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

1 जून 2021पर्यंत, सरकारने नोडल संस्थांच्या माध्यमातून 3,818.78 कोटी रुपयांचे किमान आधारभूत मूल्य असलेल्या 7,29,854.74 मेट्रिक टन मुग, उडीद, तूर, चणे, मसूर, भुईमुगाच्या शेंगा, मोहरीबीज आणि सोयाबीन यांची खरेदी केली आहे. यामुळे  तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश तेलंगणा, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांतील 4,32,323 शेतकऱ्यांना खरीप 2020-21 आणि रब्बी 2021 हंगामात फायदा झाला आहे.

 

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1723859) आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Kannada