आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 02 JUN 2021 9:49AM by PIB Mumbai


नवी दिल्ली 2 जून 2021



भारतात 1 लाख 32 हजार नव्या कोविड बाधितांची नोंद; नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम

देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ही संख्या आता 20 लाखांपेक्षा कमी म्हणजे 17,93,645

गेल्या 24 तासांत, कोविड सक्रीय रुग्णसंख्येत 1,01,875 ने घट

आतापर्यंत देशातील एकूण 2,61,79,085 रुग्ण कोरोनातून बरे झाले

गेल्या 24 तासांत 2,31,456 जण बरे झाले

दैनंदिन नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 20 व्या दिवशी जास्त

रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन आता हा दर  92.48%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 8.21%

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 6.57% इतका असून सलग 9 व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी राहिला

चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ - आतापर्यंत एकूण 35 कोटी चाचण्या करण्यात आल्या

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 21 कोटी 85 लाख मात्रा देण्यात आल्या.

***


ST/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723635) अभ्यागत कक्ष : 167