संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चेद्वारे द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा घेतला आढावा
Posted On:
01 JUN 2021 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर ड्युटेन यांच्यासोबत 1 जून 2021 रोजी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्याच्या स्थानिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी आढावा घेतला. जून 2020 मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे पालन करत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील संरक्षण भागीदारीने पुढची पायरी गाठली आहे, यावर दोन्ही संरक्षण मंत्र्यांचे एकमत झाले. मलाबार येथील संरक्षण सरावात ऑस्ट्रेलियाने घेतलेला सहभाग हा या वाढीव संरक्षण भागीदारीमधील महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.
दोन्ही मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण बंधाबद्दल संतोष व्यक्त केला. विविध पातळ्यांवरील द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला तसेच दोन्ही लष्करांमधील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मंत्री पातळीवर 2+2 संवाद आयोजित करण्यासंबंधी दोन्ही मंत्र्यांमध्ये बोलणे झाले.
कोविड-19 सोबत दोन हात करण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाने केलेल्या सहकार्याबद्दल राजनाथ सिंह यांनी यावेळी ऑस्ट्रेलियाला धन्यवाद दिले.
* * *
Jyadevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723397)
Visitor Counter : 190