संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भरता आणि संरक्षण सामग्रीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशीकरणाअंतर्गत 108 वस्तूंची दुसरी सकारात्मक यादी संरक्षण मंत्रालयाने केली अधिसूचीत
Posted On:
31 MAY 2021 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2021
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या अथक पुढाकाराने सुरु असलेल्या "आत्मनिर्भर भारतच्या" अनुषंगाने आणि संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 108 वस्तूंची दुसरी सकारात्मक यादी संरक्षण मंत्रालयाने अधिसूचीत केली आहे . संरक्षण मंत्रालयाच्या सैन्य व्यवहार विभागाने हा प्रस्ताव दिला होता. त्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली. यामुळे आत्मनिर्भरता आणि संरक्षण सामुग्रींची निर्यात ही दोन्ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या सक्रीय सहकार्याने स्वदेशीकरणाला प्रोत्साहन मिळेल. संरक्षण खरेदी प्रक्रीया (DAP) 2020 च्या तरतुदींनुसार या सर्व 108 वस्तू यापुढे स्वदेशी स्रोतांकडून खरेदी केल्या जातील.
सध्या विकास / चाचणी प्रक्रीयेत आहेत अशा शस्त्रास्त्र/ यंत्रणा, ज्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर मागणीत रुपांतरीत केले जाऊ शकते यावर दुसऱ्या यादीत भर दिला आहे. पहिल्या यादीप्रमाणेच, वारंवार लागणाऱ्या शस्त्रांस्त्रा संबंधित वस्तूंच्या आयातीला पर्याय उभा करण्यावरही लक्ष्य केन्द्रित केले आहे.
ही यादी केवळ स्थानिक संरक्षण उद्योगाच्या क्षमतांनाच मान्यता देत नाही तर स्थानिक संशोधन आणि विकासाला चालना देईल, त्या माध्यमातून तंत्रज्ञान तसेच उत्पादन क्षेत्राची क्षमता वाढवून नवी गुंतवणूक आकर्षित करेल.
स्वदेशीकरणाच्या दुसऱ्या सकारात्मक यादीत, जटील यंत्रणा, सेन्सर्स, स्टिम्युलेटर, शस्त्रास्त्र आणि हेलिकॉप्टर्स, नव्या पिढीच्या युद्धनौका, हवाई हल्ल्याची लवकर सूचना देणारी आणि नियंत्रण यंत्रणा (AEW&C), रणगाड्यांचे इंजिन्स, डोंगराळ प्रदेशांसाठी मध्यम क्षमतेचे रडार, एमआरएसएएम शस्त्रास्त्र यंत्रणा, यासह भारतीय सशस्त्र दलाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अनेक सामग्रींचा यात समावेश आहे. ही यादी डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2025 या कालावधीत टप्याटप्याने अंमलात आणली जाईल.
स्वदेशीकरणा अंतर्गतची दुसरी सकारात्मक यादी पाहण्यासाठी क्लिक करा:
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723209)
Visitor Counter : 321