संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाच्या एएलएच एमके III मध्ये आयसीयूची सुविधा

Posted On: 30 MAY 2021 7:10PM by PIB Mumbai

 

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे आयएनएस  हंसाच्या गोवा तळावरील आयएनएएस  323 मधून एएलएच एमके III वर  वैद्यकीय अतिदक्षता विभाग (MICU) स्थापित करण्यात आला आहे.  एएलएच एमके III  विमान, सगळ्या प्रकारच्या हवामानात चालू शकणारे विमान असून  MICU ने सज्ज झाल्यामुळे, भारतीय नौदल आता  प्रतिकूल हवामानातही गंभीर रुग्णांचे हवाई मार्गे  वैद्यकीय स्थलांतर करू शकते.

एमआईसीयूमध्ये  डिफिब्रिलेटर, मल्टीपरा मॉनिटर्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट तसेच इन्फ्यूजन आणि सिरिंज पंप असे दोन संच  आहेत. तसेच रुग्णाच्या  तोंडातील  किंवा श्वसनमार्गातील  स्राव काढून टाकण्यासाठी  सक्शन प्रणाली  आहे. ही प्रणाली विमानाच्या वीजपुरवठ्यावर चालवली  जाऊ शकते आणि चार तासांची बॅक अप बॅटरीदेखील आहे. विमानाचे  हवाई रुग्णवाहिकेत  रूपांतर करण्यासाठी दोन-तीन तासात उपकरणे बसविली जाऊ शकतात. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडकडून   भारतीय नौदलाला मिळणाऱ्या  आठ एमआयसीयू संचांमधले हे पहिलेच आहे.

***

S.Thakur/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722971) Visitor Counter : 171