रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्सप्रेसने 21392 मेट्रिक टनपेक्षा अधिक द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू देशात केला वितरित
313 ऑक्सिजन एक्सप्रेसनी संपूर्ण देशभरात ऑक्सिजनचे केले वितरण
ऑक्सिजन एक्सप्रेसने आतापर्यंत द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूच्या 1274 टँकरचे वहन करून 15 राज्यांना दिला दिलासा
महाराष्ट्रात आतापर्यंत 614 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचवला
Posted On:
30 MAY 2021 5:52PM by PIB Mumbai
सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत देशभरातील विविध राज्यात द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहचवण्याचा दिलासादायक प्रवास भारतीय रेल्वेने सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 21392 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू 1274 पेक्षा अधिक टँकर्समधून देशातील विविध राज्यात पोहचवला आहे.
दखल घेण्यासारखी बाब म्हणजे 313 ऑक्सिजन एक्सप्रेसनी आपला प्रवास पूर्ण करून विविध राज्यांना मदत पोहोचवली आहे.
हे पत्रक प्रसिद्ध होत असतानापर्यंत 5 ऑक्सीजन एक्सप्रेस 23 टँकर्समधून 406 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू घेऊन प्रवास करत आहेत.
ऑक्सिजन एक्सप्रेसने 36 दिवसांपूर्वी 24 एप्रिलला महाराष्ट्रात 126 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू वितरित करून आपल्या कार्यास प्रारंभ केला होता. मागणी करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.
ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या 15 राज्यांना प्राणवायूची मदत पोहोचवण्यात आली.
हे पत्रक प्रसिद्ध होत असतानापर्यंत महाराष्ट्रात 614 मे.टन प्राणवायू पोहोचवण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि सोलापूरसह देशातील 15 राज्यातील सुमारे 39 शहरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसने द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचवला आहे.
प्राणवायूची मदत शक्य तितक्या वेगाने पोहोचावी यासाठी ऑक्सीजन एक्सप्रेस मालगाड्यांच्या माध्यमातून रेल्वे नवे मापदंड आणि आदर्श रचत आहे. या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या अनेक मालगाड्यांची सरासरी गती 55 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. उच्च प्राथमिकतेच्या ग्रीन कॉरिडॉरवर या गाड्या चालवताना उच्च निकड लक्षात घेऊन प्राणवायूचे वितरण लवकरात लवकर व्हावे यासाठी अत्यंत आव्हानात्मक स्थितीत विविध विभागातील कार्यान्वयन पथके अहोरात्र काम करत आहेत.
विविध विभागांमधील चालक पथकातील बदलांसाठी तांत्रिक थांबे 1 मिनिटांपर्यंत कमी केले आहेत.
***
S.Thakur/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722941)
Visitor Counter : 194