कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त डॉ जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीर येथील 7 पंचायतींमध्ये कोविड “सेवा” कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2021 5:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीर येथील 7 पंचायतींमध्ये कोविड “सेवा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी गरजूंना कोरडा शिधा, सॅनिटायजर, मास्क, ऑक्सीमीटर्स आणि इतर साहित्य पुरवण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ जितेंद्रसिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अंत्योदय" संकल्पनेला प्राधान्य देत गेल्या सात वर्षांत अनेक ऐतिहासिक आणि लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली ती निराशावाद ते आशावाद या नव्या प्रवासाची ही सुरुवात होती आणि त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे पुरोगामी विकासाचा मार्ग मिळाला.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1722933)
आगंतुक पटल : 186