गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या अभूतपूर्व कामगिरीच्या सप्त वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

Posted On: 30 MAY 2021 2:31PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या अभूतपूर्व कामगिरीच्या सप्त वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमित शहा यांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मोदी सरकारने विकास, सुरक्षा, लोककल्याण आणि ऐतिहासिक सुधारणांमध्ये अतुलनीय समन्वय साधण्याचे अनन्यसाधारण उदाहरण सादर केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, या 7 वर्षात मोदींनी एकीकडे देशहिताला सर्वोच्च स्थानी ठेवत आपल्या दृढनिष्ठ, सर्वांगीण आणि कल्याणकारी धोरणांच्या आधारे देशाचे हित राखून गरीब, शेतकरी आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडत त्यांचे जीवनमान सुधारले आहे आणि दुसरीकडे, त्यांच्या भक्कम नेतृत्त्वातून त्यांनी भारताला एक सामर्थ्यवान राष्ट्र बनवले .

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722903) Visitor Counter : 133