ऊर्जा मंत्रालय
पॉवरग्रीड कंपनीकडून कोविड उपचारासंदर्भात उपक्रम
Posted On:
26 MAY 2021 10:34AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत ‘पॉवरग्रीड’ अर्थात भारतीय पॉवर ग्रीड महामंडळ, मर्यादित, ही ‘महारत्न’ कंपनी, कोविडचा संसर्ग झालेल्या कंपनीच्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचार घेण्यासाठी लागणारी सर्व मदत पुरवत आहे तसेच कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तणुकीचे पालन करण्यासाठी जागृती निर्माण करीत आहे.
पॉवरग्रीडच्या उत्तर विभाग – II मधील अधिकाऱ्यांनी जालंधर, मोगा, हमीरपुर आणि वागोरा यांसह विविध सब-स्टेशन्सच्या ठिकाणी सध्या कंपनीत कार्यरत कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय, कंत्राटी कामगार, निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांसाठी पाच वेळा लसीकरण मोहिमांचे आयोजन केले. जम्मू येथील प्रादेशिक मुख्यालयात देखील सुमारे 100 कंत्राटी कामगारांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
कंपनीतर्फे, ऑक्सिजन सुविधा असलेल्या 35 खाटांची कोविड सुविधा उभारण्यात आली आहे. परिचारिका आणि लसीकरणविषयक तज्ञ यांची सेवा अहोरात्र उपलब्ध असलेले विलगीकरण केंद्र उभारण्यात आले असून त्याद्वारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना चोवीस तास सल्ला सेवा आणि तपासणीसाठी व्यक्तिगत भेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कंपनीच्या सेवेतील कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मदतनीस कर्मचारीवर्ग यांच्यात सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, हाताची नियमित स्वच्छता करणे यांच्या महत्त्वाबाबत जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने जम्मूच्या प्रादेशिक मुख्यालयातील मुख्य द्वार, पार्किंगची जागा, लिफ्टचा परिसर आणि स्वागतकक्षात तसेच पॉवरग्रीड निवासी संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार, ट्रान्झिट कॅम्प आणि सामाजिक भवनात कोविड प्रतिबंधात्मक योग्य वर्तणूक दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत.
ह्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून आजारी व्यक्तींचे व्यवस्थापन करून त्यांना शक्य तितकी उत्तम आरोग्य देवा पुरविण्यात मोठी मदत झाली आहे.
***
ST/Sanjana C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721828)
Visitor Counter : 205