राष्ट्रपती कार्यालय

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

Posted On: 25 MAY 2021 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मे 2021

 

राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिलेल्या  संदेशात  म्हटले आहे: -

बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी  मी सर्व नागरिक  आणि जगभरातील भगवान बुद्धाच्या अनुयायांना  शुभेच्छा देतो.

भगवान बुद्धाची  शिकवण आपल्याला वेदना आणि दुःखापासून  मुक्तीच्या मार्गाकडे नेते. त्यांनी लोकांना हिंसाचार आणि अन्यायापासून दूर रहायला शिकवले  आणि हा मंत्र आपल्याला शतकानुशतके आदर्श माणूस बनण्यासाठी प्रोत्साहित  करत आहे. भगवान बुद्धांचे जीवन  अहिंसा, शांती, करुणा आणि मानवतेची सेवा हे आदर्श  आणि मानवतेच्या सेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत आणि  त्यांच्या शाश्वत शिकवणीने संपूर्ण जगात मानवी संस्कृती विकसित करण्यात  खोलवर प्रभाव पाडला आहे.

आपल्याला कोविड -19 महामारीच्या रूपाने  अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागला आहे. बुद्ध पौर्णिमेच्या या पवित्र सणानिमित्त, मी प्रार्थना करतो की आपल्या ऐक्यातून आणि सामूहिक  संकल्पातून आपण या महामारीतून यशस्वीपणे बाहेर पडू आणि अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी पुढे वाटचाल सुरु ठेवू या.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1721697) Visitor Counter : 163