नौवहन मंत्रालय
‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील महत्वाच्या बंदरांच्या सज्जतेचा घेतला आढावा
Posted On:
25 MAY 2021 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2021
केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी आज ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील पूर्व समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या महत्वाच्या बंदरांच्या सज्जतेचा आढावा घेतला. या बैठकीला, जहाजबांधणी, बंदरे आणि जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ मंत्री आणि महत्वाच्या बंदर प्राधिकरणांचे अध्यक्ष उपस्थित होते.
या वादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय काय तयारी करण्यात आली आहे, याची माहिती संबंधित अध्यक्षांनी या बैठकीत दिली.
महत्वाच्या बंदरांचे आणि बंदरांवरील मालमत्तांचे या वादळात कमीतकमी नुकसान व्हावे, तसेच जीवहानी होऊ नये, अशी काळजी घेतली जावी, असे मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितले. तसेच, गरज पडल्यास, या बंदरांच्या आसपास असलेल्या लोकांचीही मदत केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली. बंदरांच्या अध्यक्षांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठीची सज्जता ठेवण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721695)
Visitor Counter : 165