आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
74 व्या जागतिक आरोग्य परिषदेचे डॉ.हर्ष वर्धन यांनी आभासी पद्धतीने भूषविले अध्यक्षस्थान
Posted On:
24 MAY 2021 10:06PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. हर्ष वर्धन यांनी आज 74 व्या जागतिक आरोग्य परिषदेचे आभासी पद्धतीने अध्यक्षस्थान भूषविले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोसही यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. हर्ष वर्धन यांनी कार्यकारी मंडळाच्या 147 व्या आणि 148 व्या सत्राचे ठळक मुद्दे आणि 5 आणि 6 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी घेतलेल्या कोविड -19 च्या प्रतिसादावरील विशेष सत्राचा गोषवारा दिला.
डॉ. हर्ष वर्धन यांनी सार्वभौम आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केलेल्या पहिल्या स्तंभाला बळकटी देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे स्पष्टीकरण दिले.
आरोग्य आपत्कालीन परिस्थितीवर दुसरा आधारस्तंभ म्हणून भर देताना डॉ. हर्ष वर्धन यांनी असे सांगितले की, मंडळाने कोविड -19 च्या जागतिक आरोग्यावर होणार्या दुष्परिणामांविषयी विस्तृत आणि सखोल चर्चा केली. मंडळाने सदस्यांनी घेतलेल्या विविध उपाययोजनांची नोंद केली आणि जागतिक सार्वजनिक वस्तू म्हणून कोविड -19 वरची औषधे व लसींना मान्यता मिळून त्याबाबत सर्वांना न्याय्य प्रवेश मिळण्याच्या हमीचे महत्त्व अधोरेखित केले. मंडळाने अशीही शिफारस केली आहे की 74 व्या जागतिक आरोग्य परिषदेने कोविड -19 महामारी आणि त्यासाठी मानसिक आरोग्य तयारी आणि त्यासंबंधित अहवालावर विचार करावा आणि 2013 ते 2030 या कालावधीत अद्ययावत सर्वसमावेशक मानसिक आरोग्य कृती योजनेस मान्यता द्यावी.
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721416)
Visitor Counter : 2569