PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
23 MAY 2021 8:05PM by PIB Mumbai
- With 21.23 Lakh Tests, India sets a New Record again with Highest ever Tests Conducted in the last 24 hours
- Daily Positivity Rate Declines to 11.34%
- At 2.4 Lakh, Lowest Daily New Cases after 36 days
- Cumulative Vaccine Coverage exceeds 19.5Crore
- Oxygen Expresses delivery crosses 15000 MT of Liquid Medical Oxygen to the nation
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 23 मे 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासांत 21.23 लाखांहून अधिक चाचण्या पूर्ण करत, भारताने पुन्हा एकदा, एकाच दिवसात सर्वाधिक चाचण्यांचा करण्याचा नवीन विक्रम नोंदविला आहे. 20 लाखांहून अधिक चाचण्या करण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे. 2020 च्या जानेवारीपासून भारताने दररोज चाचण्या करण्याच्या आपल्या क्षमतेत सुमारे 25 लाख पर्यंत उल्लेखनीय वाढ केली आहे. मागील 24 तासांत देशात एकूण 21,23,782 चाचण्या घेण्यात आल्या.
आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे, सलग सातव्या दिवशी भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत 3 लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,40,842 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली. ही 17 एप्रिल 2021 नंतरची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, ज्यावेळी दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 2.34 लाख इतकी होती.
भारतात सलग नवव्या दिवशी, दैनंदिन कोविडमुक्त होण्याऱ्या रुग्णांची संख्या, दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांपेक्षा वाढत आहे. गेल्या 24 तासांत 3,55,102 रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली. भारतात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 2,34,25,467 वर पोहोचली आहे.रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 88.30% पर्यंत पोहोचला आहे.
दुसरीकडे, भारतातील एकूण सक्रिय रूग्णसंख्या आज 28,05,399 वर पोचली आहे. गेल्या 24 तासांत 1,18,001 ची घट नोंदवली गेली. आता देशातील एकूण रूग्णांपैकी 10.57% रूग्ण सक्रीय आहेत. भारताच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 66.88% रूग्ण 7 राज्यांत आहेत.
राष्ट्रीय मृत्यु दर सध्या 1.13% इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,741 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी 73.88% मृत्यू दहा राज्यांत झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक (682) मृत्यू झाले त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 451 मृत्यूंची नोंद झाली.
देशभरात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत लसींच्या एकूण मात्रांनी 19.50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
इतर अपडेट्स :
- मुंबईच्या संशोधक विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी कल्पकतेने 'कोव्ह-टेक व्हेंटीलेशन प्रणाली' म्हणजे हवेशीर पीपीई किट्स तयार केल्या.
- भारत सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य आणि थेट खरेदी या दोन्ही माध्यमांद्वारे 21.80 कोटी पेक्षा अधिक (21,80,51,890) लसींच्या मात्रा प्रदान केल्या आहेत.
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत, 16,630 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स, 15,961 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 11,516 व्हेंटीलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीविर इंजेक्शनच्या 6.9 लाख कुप्या त्वरेने वितरीत/रवाना करण्यात आल्या.
- भारतीय रेल्वेने आतापर्यंत देशातील विविध राज्यांत 936 हून अधिक टँकरमधून 15,284 मेट्रिक टन पेक्षा अधिक एलएमओचे वितरण केले असून, 234 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे.
- संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारावीची परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत आज राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721121)
Visitor Counter : 179