कायदा आणि न्याय मंत्रालय

सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने विनामूल्य “ई-कोर्ट सर्व्हिसेस मोबाइल ॲप ” ची माहितीपुस्तिका 14 भाषांमध्ये प्रसिद्ध केली


इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध या पुस्तिकेत सामान्य लोकांना सहज समजण्यासाठी स्क्रीनशॉटद्वारे अ‍ॅपच्या सर्व वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण

Posted On: 23 MAY 2021 11:07AM by PIB Mumbai

सर्वोच्च न्यायालयाच्या  ई-समितीने नागरिक-केंद्रित सेवेसाठी  विनामूल्य  “ई-कोर्ट सर्व्हिसेस मोबाइल ॲप ” ची माहितीपुस्तिका  14 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू) प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या  ई-समितीने  याचिकाकर्ते, नागरिक, वकील, कायदा संस्था, पोलिस, सरकारी संस्था आणि इतर संस्थागत वकील यांच्या हितासाठी आधीच जारी केलेले “ई-कोर्ट सर्व्हिसेस मोबाईल ॲप ने ” आतापर्यंत  57 लाख डाऊनलोडचा टप्पा  ओलांडला आहे.

इंग्रजी व प्रादेशिक भाषांमध्ये मोबाइल ॲप व त्याची पुस्तिका -सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://ecommitteesci.gov.in/service/ecourts-services-mobile-application/  विनामूल्य  डाऊनलोड करता येते. .

सर्वोच्च न्यायालयाचे  न्यायाधीश आणि ई समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचुड यांनी प्रस्तावना लिहिली असून  या नि: शुल्क मोबाइल अ‍ॅपचे महत्त्व विशद केले आहे  आणि या नागरिक-केंद्रित मोबाईल अ‍ॅपची व्याप्ती अधोरेखित केली आहे. ते म्हणाले, “कायद्याच्या क्षेत्रात डिजिटल सुधारणा सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाची  ई-समिती आघाडीवर  आहे. गेल्या एक वर्षात, महामारीने  लॉकडाऊन आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्येमुळे  कार्यालये आणि न्यायालये बंद केल्यामुळे वकिल, न्यायाधीश आणि याचिकाकर्त्याना उच्च तंत्रज्ञान वापरायला  उद्युक्त केले. दूरस्थपणे कार्य करणे, आभासी न्यायालये, डिजिटल कार्यस्थळे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खटले व्यवस्थापन न्यायालय प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनले आहेत. तंत्रज्ञानाला केवळ अंतरिम उपाय म्हणून नाही तर आपली कायदा व्यवस्था  अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक, प्रवेश करण्यायोग्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत  बनविण्यासाठी  दुर्मीळ संधी आम्हाला मिळाली आहे. ई-न्यायालये सर्व्हिसेस मोबाइल अप्लिकेशन हे  या दिशेने एक पाऊल आहे. "  ते पुढे म्हणाले की आतापर्यंत 57 लाखाहून अधिक डाउनलोडसह अनेक वकिलांनी व याचिकाकर्त्यांनी या मोबाइल ॲपद्वारे  देऊ केलेल्या सेवा स्वीकारल्या आहेत.

न्याय विभागाचे सचिव वरूण  मित्रा यांनीही  या पुस्तिकेची प्रस्तावना लिहिली  आहे. त्यांनी वकिलांसाठी इलेक्ट्रॉनिक केस मॅनेजमेंट टूल्सचे महत्त्व अधोरेखित केले.  ते म्हणाले, “कायद क्षेत्र  हळूहळू जागतिक स्तरावर  डिजिटल बनत चालले आहे,  या बहुआयामी उपक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून, एक प्रभावी इलेक्ट्रॉनिक केस मॅनेजमेंट टूल (ईसीएमटी) म्हणून ईकोर्ट्स सर्व्हिसेस मोबाइल ॲपचे व्यापकपणे स्वागत केले गेले

इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध ई-समितीची  पुस्तिका सर्वसामान्यांना सहज  समजण्यासाठी स्क्रीनशॉटसह सर्व वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत.  संबंधित उच्च न्यायालयांच्या केंद्रीय प्रकल्प समन्वयकांच्या सहकार्याने ई-कोर्ट सर्व्हिसेस मोबाईल ॲप मॅन्युअलचे इंग्रजी भाषांतर ई-समितीच्या इन-हाऊस मानव संसाधन चमूने प्रादेशिक भाषांमध्ये केले.  प्रादेशिक भाषांमधील पुस्तिका संबंधित उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

ईकोर्ट सर्व्हिसेस मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून, नागरिक-केंद्रीत विविध सेवा मिळू शकतात जसे की केस क्रमांक, सीएनआर क्रमांक, फाईलिंग नंबर, पक्षकारांची नावे, एफआयआर क्रमांक, वकिलांचा तपशील, कायदे इत्यादी . तसेच  सीएनआर , केस स्टेटस सर्च, कॉज लिस्ट सर्च असे विविध शोध प्रकार उपलब्ध आहेत. खटल्याच्या तारीखनिहाय  डायरीसह सम्पूर्ण केसचा  इतिहास मिळू शकतो. मोबाईल अ‍ॅपवरून ऑर्डर / निवाडा , केसचे तपशील हस्तांतरण, अंतरिम अर्ज स्थिती याची माहिती मिळू शकते.  ई-कोर्ट सेवा  मोबाइल अ‍ॅपद्वारे एखाद्याला उच्च न्यायालये व जिल्हा न्यायालयांची प्रकरणाची स्थिती / खटल्याची माहिती मिळू शकते.

वकील, याचिकाकर्ते ,  संस्था "माय केसेस" अंतर्गत सर्व प्रकरणांची डिजिटल डायरी ठेवू शकतात.  वकील, याचिकाकर्ते यांच्यासाठी हे  सर्वात जास्त वापरले  जाणारे आणि आकर्षक वैशिष्ट्य आहे. याचिकाकर्ते,  कंपन्या किंवा संघटना ज्यांची वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक खटले  आहेत त्यांना देखील उपयुक्त आहे. 'माय केसेस' मध्ये, एखादी व्यक्ती त्याच्या व्यक्तिगत प्रकरणांची यादी जोडू शकते आणि ई-कोर्ट्स मोबाइल ॲपद्वारे  सर्व अद्यतने मिळवू शकते.

सर्व ई-न्यायालय सेवा ई-कोर्ट्स  मोबाइल ॲपशी देखील जोडलेल्या आहेत.

ई-कोर्ट्स मोबाइल अॅप भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे.

ई-कोर्ट सर्व्हिसेस मोबाईल ॲप  सामान्य नागरिक / वकील / संस्था / सरकारी विभाग यांच्यासाठी वैयक्तिक डिजिटल केस डायरी आहे जी  24X7 विनामूल्य उपलब्ध आहे.

त्यामुळे महामारीदरम्यान , कोणालाही संबंधित न्यायालयात प्रत्यक्ष  न जाता ई-कोर्ट सर्व्हिसेस मोबाइल ॲपद्वारे  त्यांच्या मोबाईल फोनवर  केसची स्थिती, कोर्टाचे आदेश, कॉज लिस्ट यांची माहिती केव्हाही विनामूल्य मिळू शकते!

***

MC/Sushama K/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1721044) Visitor Counter : 421