अर्थ मंत्रालय

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात - 1 ते 6 जून पर्यंत ई-फाइलिंग सेवा उपलब्ध नाहीत

Posted On: 20 MAY 2021 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021


प्राप्तिकर विभाग आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल www.incometax.gov.in, 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा उद्देश (www.incometax.gov.in) करदात्यांना सुविधा पुरवणे आणि आधुनिक गतिमान अनुभव प्रदान करणे हा आहे

  • करदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी आयकर विवरणपत्राच्या (आयटीआर) त्वरित प्रक्रियेसह एकत्रित केलेले नवीन करदाता स्नेही  पोर्टल;
  • करदात्यांना पाठपुरावा करता यावा यासाठी सर्व परस्पर संवाद आणि अपलोड किंवा प्रलंबित कारवाई एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केले जातील;
  • डेटा एन्ट्री प्रयत्न कमी करण्यासाठी,  कोणतीही कर-विषयक माहिती नसल्यास देखील , करदात्यांना आयटीआर भरण्यास मदत करण्यासाठी विनामूल्य  आयटीआर तयार करण्याचे सॉफ्टवेअर इंटरॅक्टिव्ह प्रश्नांसह ऑनलाईन  आणि  ऑफलाइन उपलब्ध
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ट्युटोरिअल्स, व्हिडिओ आणि चॅटबॉट / लाइव्ह एजंटसह करदात्यांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देण्यासाठी करदात्याला सहाय्य करण्यासाठी नवीन कॉल सेंटर;
  • डेस्कटॉपवरील सर्व प्रमुख पोर्टल कार्ये मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध असतील जी नंतर मोबाइल नेटवर्कवर कोणत्याही वेळी पाहता येतील ;
  • कर सुलभपणे भरण्यासाठी कोणत्याही बँकेच्या करदात्याच्या खात्यातून नेटबँकिंग, यूपीआय, क्रेडिटकार्ड आणि आरटीजीएस / एनईएफटी वापरून बहुविध नवीन पेमेंट पर्यायांसह नवीन पोर्टलवरील नवीन ऑनलाइन कर भरणा प्रणाली सक्षम केली जाईल .

हे पोर्टल सुरु करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरण कामांसाठी विभागाचे विद्यमान पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in करदात्यांसह अन्य बाह्य हितधारकांना 6 दिवसांच्या अल्प कालावधीसाठी म्हणजेच 1 जून, 2121 ते 6 जून पर्यंत , 2021 उपलब्ध नसेल. .

करदात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विभाग या कालावधीत कोणत्याही अनुपालन तारखा निश्चित करणार नाही. तसेच  करदात्यांना नवीन प्रणालीवर प्रतिसाद देण्याबाबत वेळ देण्यासाठी 10 जून, 2021 पासून केवळ खटल्यांच्या सुनावणीच्या तारखा किंवा अनुपालन तारखा  निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर, या कालावधीत ऑनलाइन सबमिशन आवश्यक असणारी कोणतीही सुनावणी किंवा अनुपालन ठरवले असेल तर ते अगोदर घेतले  जाईल किंवा पुढे ढकलले जाईल आणि या कालावधीनंतर कामाचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.

विभागाने बँका, एमसीए, जीएसटीएन, डीपीआयआयटी, सीबीआयसी, जीईएम , डीजीएफटी यासारख्या बाह्य संस्था ज्या  पॅन पडताळणीची सेवा उपलब्ध करतात त्यांना या सेवा  उपलब्ध नसल्याबद्दल कळवण्यात आले आहे आणि इतर ग्राहकांना /हितधारकांना  अवगत करण्याबाबत व्यवस्था करायची विनंती केली आहे. जेणेकरून ब्लॅकआउट कालावधीच्या आधी किंवा नंतर कोणतीही संबंधित क्रिया पूर्ण केली जाऊ शकेल.

ब्लॅकआउट कालावधी दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून करदात्यांना 1 जून 2021 पूर्वी कोणतीही सबमिशन, अपलोड किंवा डाउनलोड यासह त्यांची  सर्व तातडीची  कामे पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

या  नवीन ई-फायलिंग पोर्टलच्या क्रियांन्वयनादरम्यान  आणि त्यानंतरच्या प्रारंभिक कालावधीत नवीन प्रणालीशी परिचित होताना सर्व  करदाते  आणि इतर हितधारकांनी संयम बाळगावा अशी  विनंती विभागाने केली आहे. करदाता आणि इतर हितधारकांचे अनुपालन सुलभ करण्यासाठी सीबीडीटीचा  हा आणखी एक उपक्रम आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1720375) Visitor Counter : 237