संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी तौते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलाच्या प्रयत्नांचा घेतला आढावा

Posted On: 17 MAY 2021 4:31PM by PIB Mumbai

संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी, मे 17, 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या  बैठकीत , तौते  चक्रीवादळामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलाच्या सज्जतेचा आणि नागरी प्राधिकरणाला सशस्त्र दलाने पुरविलेल्या मदतीचा आढावा घेतला.

     चीफ ऑफ डिफेन्स स्टॅफ  जनरल बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार,नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह,हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस भदौरिया,आणि लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे आणि  संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे ( डीआरडीओ) अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.

      श्री. राजनाथ सिंह यांना या बैठकीत माहिती देण्यात आली की,  प्रभावित राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून काही विनंती आल्यास भारतीय नौदलाची 11 सागरी बचाव  पथके  सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्वरित प्रतिसाद आणि तैनातीसाठी,  बारा पूर बचाव पथके आणि वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत.आवश्यकता भासल्यास, चक्रीवादळानंतर पायाभूत सुविधांच्या त्वरित दुरुस्तीसाठी , दुरुस्ती आणि  बचाव पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

      आवश्यकता असल्यास, प्रभावित क्षेत्रात त्वरित मदतीसाठी तीन जहाजे  (तलवार, तरकश आणि तबार) मदत आणि  मदत सामग्रीसह  सज्ज ठेवण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे अडकलेल्या मासेमारी नौका / छोट्या नौकांच्या मदतीसाठी पश्चिम  किनारपट्टीवर शिल्लक जहाजेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. देखरेख ठेवण्यासाठीचे नौदलाचे  सागरी टेहळणी विमान मच्छीमारांना सातत्याने चक्रीवादळासंदर्भातील इशारे प्रसारित करीत आहे.

   संरक्षण मंत्र्यांना माहिती देण्यात आली की, अहमदाबाद येथे एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांच्या आणि मोठ्या प्रमाणात सामग्रीच्या वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाने आपले विमान तैनात केले आहे.

           श्री राजनाथ सिंह यांना हीसुद्धा माहिती देण्यात आली की, जामनगरहून दीव साठी अभियंता कृती दलासह  लष्कराच्या दोन तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास त्वरित प्रतिसादासाठी आणखी लष्कराच्या आणखी  दोन तुकड्या जुनागडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाशी लष्कर सतत संपर्कात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. 

 

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719432) Visitor Counter : 170