रसायन आणि खते मंत्रालय

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी उचललेली पावले

Posted On: 15 MAY 2021 7:36PM by PIB Mumbai

 

भारत सरकार शेतकऱ्याना उत्पादक आणि आयातदारांकडून खते विशेषतः युरिया व डाय अमोनियम फॉस्फेट (DAP), म्युरेट ऑफ पोटॅश फॉस्फेट आणि पोटॅश (MOP) तसेच सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) यांचा समावेश असलेली फॉस्फेट व पोटॅश गटातील (P&K)  22 प्रकारची खते अनुदानित भावात उपलब्ध करून देत देत आहे.  फॉस्फेट व पोटॅश गटातील (P&K) खतांवरील अनुदान 01.04.2010 पासून राष्ट्रीय मानक ब्युरोकडून निर्धारित होत आहे.

आपल्या शेतकरीकेंद्री धोरणाला अनुसरून भारत सरकारने शेतकऱ्यांना किफायतशीर दरात फॉस्फेट व पोटॅश गटातील (P&K) खते  उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहे.  खतामधील पोषक तत्वांवर आधारीत दरांनुसार खत कंपन्यांना अनुदान दिले जाईल त्यामुळे त्या शेतकऱ्यांना किफायतशीर भावात खते उपलब्ध करून देऊ शकतील.

गेल्या काही महिन्यात DAPच्या कच्च्या मालावरील आणि फॉस्फेट आणि पोटॅशच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तयार DAP च्या किमतीही वाढल्या आहेत. किमती खूप वाढल्या असतानाही गेल्या महिन्यापर्यंत खत कंपन्यांनी भारतात DAP च्या किमती वाढवल्या नव्हत्या. आता मात्र काही कंपन्यांनी किंमतीत वाढ केली आहे.

सरकारला या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आणि ती सरकारतर्फे वरिष्ठ पातळीवरून हाताळली जात आहे. याशिवाय सरकार शेतकऱ्यांच्या चिंतेबद्दल पूर्ण संवेदनशील असून पोटॅश आणि फॉस्फेट गटातील ( तसेच DAP) खतांच्या किमतीतील वाढीमुळे होणाऱ्या परिणामांपासून त्यांना संरक्षण देण्यासाठी आधीच पावले उचलत आहे.

पहिले पाऊल म्हणून शेतकऱ्यांना ही सर्व खते बाजारात विनासायास आणि पुरेश्या प्रमाणात उपलब्ध व्हावी याची खबरदारी घेण्याचे निर्देश खत कंपन्यांना देण्यात आले आहेत. सरकारकडून देशातील खतांच्या उपलब्धतेचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.

DAP किमतीच्या बाबतीत, सरकारने खत कंपन्यांना आधीचा DAP चा माल फक्त जुन्या भावातच विकण्यास सांगितले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅश व फॉस्फेट तसेच DAPच्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा भार कमी करण्यासाठी भारत सरकार अनुदानित दर लावून शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करून त्यांना सहाय्य देण्याच्या विचारात आहे.

कोविड महामारीच्या या असामान्य कालखंडात भारत सरकार शेतकऱ्यांच्या हित रक्षणासाठी योग्य ती सर्व पावले उचलत आहे.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718886) Visitor Counter : 408