ऊर्जा मंत्रालय
कोविड विरूद्धच्या लढाईत पॉवरग्रिडचा पुढाकार
कार्पोरेट सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत पॉवरग्रिडने 1,14,30,000 रुपयांचे नऊ आयसीयू व्हेंटिलेटर केले उपलब्ध
Posted On:
15 MAY 2021 6:54PM by PIB Mumbai
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID), या भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘महारत्न’ कंपनीने आपल्या देशभरातील सर्व कार्यालयांमधील कर्मचार्यांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम सक्रियपणे हाती घेतले आहेत.
या महामारीचा सामना करण्यासाठी आणि विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. यानुसार पॉवरग्रिड आपल्या सर्व कर्मचार्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरण शिबिरांचे आयोजन करीत आहे. या लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पॉवरग्रिडने, गेल्या वर्षी गुरूग्राम मधील सेक्टर 46 येथे त्यांनी स्थापन केलेल्या विलगीकरण केंद्राची क्षमता वाढविली आहे. मानेसर येथे एक नवीन विलगीकरण कक्ष देखील सुरू करण्यात आले आहे.ही विलगीकरण केंद्रे सुसज्ज आहेत . अशाच प्रकारच्या केंद्रांची स्थापना देशभरातील पॉवरग्रिडच्या कार्यालयात तयार करण्यात आली आहेत.
पॉवरग्रिडने त्यांच्या कार्पोरेट सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत, 1,14,30,000 / - रूपये किंमतीचे नऊ, व्हेंटिलेटर , महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अति दक्षता विभागाकडे सुपूर्द केले. या आयसीयू व्हेंटिलेटरचा उपयोग सध्याच्या महामारीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे.
याशिवाय विविध राज्यांतील प्रशासनांकडे मास्क्स आणि सॅनिटायझर्सचे वितरण केले जात आहे. सध्याच्या महामारीच्या काळात रुग्णवाहिकांचे महत्त्व समजून पॉवरग्रिडने कोविड -19 बाधित रूग्णांची काळजी घेण्यासाठी वडोदरा महानगरपालिकेला एक रुग्णवाहिका दिली.
कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभाग कर्मचार्यांना आणि सर्वसामान्यांना कोव्हीड मार्गदर्शक तत्वे आणि सुयोग्य वर्तन याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करीत आहे.
***
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718867)
Visitor Counter : 211