रसायन आणि खते मंत्रालय

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (पीएमबीजेके), बीपीपीआय आणि इतर भागधारकांनी अत्यावश्यक औषधे आणि इतर वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध करुन दिल्या


देशभरात 7733 पीएमबीजेके कार्यरत आहेत

Posted On: 14 MAY 2021 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मे 2021

 

प्रधानमंत्री  भारतीय जनऔषधी  केंद्रे (पीएमबीजेके), ब्युरो ऑफ फार्मा  पीएसयू ऑफ इंडिया (बीपीपीआय), वितरक आणि इतर भागधारक एकत्र आले असून  कोविड-19 महामारीच्या विरोधातील लढ्यात योगदान देत आहेत.

13.05.2021 पर्यंत, 7733 प्रधानमंत्री  भारतीय जनौषधी केंद्रे (पीएमबीजेके) देशातील  36 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या पीएमबीजेके मार्फत 1449 औषधे आणि 204 सर्जिकल व उपभोग्य वस्तू पीएमबीजेपीच्या केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. देशभरातील पीएमबीजेकेमध्ये आवश्यक औषधे आणि फेस मास्क आणि सॅनिटायझर्स सारख्या इतर वस्तू सहज उपलब्ध आहेत. पीएमबीजेपी अंतर्गत, दर्जेदार एन-95 फेस मास्क  सर्व पीएमबीजेकेवर केवळ  25/- रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला  जात आहे.

2021-22 या चालू आर्थिक वर्षात 13.05.2021 पर्यंत बीपीपीआयने 80.18 कोटी रुपयांची विक्री केली आहे, ज्यामुळे नागरिकांची सुमारे 500 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

लॉजिस्टिक यंत्रणा मजबूत केली जात आहे. सध्या गुरूग्राम, गुवाहाटी आणि चेन्नई येथे तीन आधुनिक गोदामे औषधांची साठवण आणि वितरण करण्यासाठी कार्यरत आहेत आणि चौथे सुरत येथे बांधले जात आहे. याशिवाय दुर्गम आणि ग्रामीण भागात औषध पुरवठा करण्यासाठी देशभरात 37 वितरक नियुक्त केले  आहेत.

2020-21 वर्षात जेंव्हा कोविड संकटाला सुरुवात झाली तेंव्हा प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनाने (पीएमबीजेपी) देशासाठी अत्यावश्यक सेवा बजावली.  लॉकडाऊन दरम्यान ही दुकाने सुरु होती आणि आवश्यक औषधांचा अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या बांधिलकीचा भाग म्हणून परिचालन सुरु होते.

पीएमबीजेपी अंतर्गत औषधाची किंमत अव्वल तीन ब्रांडेड औषधांच्या सरासरी किंमतीच्या जास्तीत जास्त 50% आधारे ठेवण्यात आली आहे.  म्हणूनच, जन औषधीअंतर्गत औषधांची किंमत किमान 50% कमी आहे आणि काही बाबतींत, ब्रँडेड औषधांच्या बाजारभावाच्या 80% ते 90% पर्यंत ती स्वस्त आहेत .

2020-21 आर्थिक वर्षात टाळेबंदी आणि कठीण काळ असूनही बीपीपीआयने 665.83 कोटी रुपयांची विक्रीतील उलाढाल नोंदवली आहे.  यामुळे देशातील सामान्य नागरिकांची  4000 कोटी  रुपयांची बचत झाली आहे.  बीपीपीआयने फेस मास्क, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, पॅरासिटामोल आणि अझिथ्रोमाइसिन यासारख्या मोठी मागणी असलेल्या औषधांचा पुरेसा साठा राखला. बीपीपीआयने 2020-21 या आर्थिक वर्षात देशातील 7500 पेक्षा जास्त जन औषाधि केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 25 लाख फेस मास्क, 1.25 लाख सॅनिटायझर्स, हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या 137 लाख टॅब्लेट्स आणि 323 लाख पॅरासिटामोल टॅब्लेट्स  स्वस्त दरात विकली  आहेत. बीपीपीआयनेही परराष्ट्र मंत्रालयाला 30 कोटी रुपयांची औषधे पुरवली  आहेत. पीएमबीजेपीच्या केंद्रांवर  कोविड 19 च्या उपचारादरम्यान वापरली जाणारी अनेक औषधे आणि ओटीसी वस्तू उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि परियोजनेने सर्वांची (महिला व मुलांसह) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पोषक  उत्पादने आणली आहेत.  या सर्व उत्पादनांच्या पीएमबीजेपीच्या किंमती बाजारात उपलब्ध उत्पादनांपेक्षा 50% -90% कमी आहेत.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/janas114052021.mp4

गेल्या वर्षी लॉकडाऊन कालावधीत प्रधानमंत्री भारतीय जनौषधि केंद्रे (पीएमबीजेके) यांनी देशातील सामान्य नागरिकांना त्यांच्या दारात स्वस्त दरात दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करुन त्यांच्या आवश्यक सेवा पुरवली.  "स्वास्थ्य  के सिपाही" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्राच्या औषध विक्रेत्यांनी रुग्णांना आणि वृद्धांना त्यांच्या घरी  औषधे पुरवली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/janas214052021.mp4


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718650) Visitor Counter : 191