ऊर्जा मंत्रालय

ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाकडून लसीकरण शिबिराचे आयोजन

Posted On: 13 MAY 2021 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

 

केंद्रीय सार्वजनिक उपक्रमातील नवरत्न कंपन्यांपैकी उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ मर्यादित या उपक्रमाने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त अपोलो रुग्णालयाच्या मदतीने विविध विद्युतीकरण क्षेत्रात मोडणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमातील 18 ते 45 वयोगटातील कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता तसेच आदरभाव व्यक्त करण्यासाठी अपोलो रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कंपनीचे 500 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या शिबिरात लसीचा पहिला डोस घेण्यासाठी आले होते.   ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ देशाच्या सेवेतील मुख्य भागीदार म्हणून नेहमीच काळाच्या कसोटीवर उतरत आले आहे.

ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाबद्दल माहिती: ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ हा नवरत्न कंपन्यांपैकी बिगर बँकिग वित्तीय क्षेत्रातील उपक्रम असून तो भारतभरामध्ये विद्युत क्षेत्रातील निधी आणि विकास या कामांशी संलग्न आहे. 1969 मध्ये स्थापन झालेले ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ या कार्यक्षेत्रात 50 हून अधिक वर्षे कार्यरत आहे. राज्य विद्युत महामंडळ, राज्य सरकारे, केंद्र/राज्य विद्युत सेवा, स्वतंत्र विद्युत निर्माण उपक्रम, ग्रामीण विदयुत सहकारी व खाजगी उपक्रम यांना ते अर्थसहाय्य पुरवते. संपूर्ण विद्युत क्षेत्र मुल्य साखळी, विद्युत निर्माण, वहन व वितरण क्षेत्रातील प्रकल्प तसेच नवीकरणीय उर्जा प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे.

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718388) अभ्यागत कक्ष : 232