संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाची कोची आणि ताबर ही जहाजे महत्त्वपूर्ण वैद्यकीय साधनसामग्री घेऊन न्यू मेंगलोर बंदरात दाखल

Posted On: 11 MAY 2021 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2021

कोविड मदतीसाठी सुरु केलेल्या समुद्रसेतू-II अभियानाला नव्या उंचीवर पोहोचवत भारतीय नौदलाची आणखी दोन जहाजे - आयएनएस कोची आणि आयएनएस ताबर दि. 11 मे 21 रोजी, महत्त्वपूर्ण वैद्यकीय साधनसामग्रीसह न्यू मेंगलोर बंदरात दाखल झाली.

एकूण पाच कंटेनर्समध्ये 100 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणि 1200 ऑक्सिजन सिलेंडर घेऊन या दोन्ही जहाजांनी दि. 06 मे 21 रोजी कुवेतच्या बंदरातून भारतासाठी प्रस्थान ठेवले होते.

आज आणलेली सामग्री, पुढील कार्यवाहीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

 

M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717781) Visitor Counter : 227