रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेकडून ऑक्सिजन एक्स्प्रेस मिळणारे नववे राज्य ठरणार उत्तराखंड


ऑक्सिजन एक्स्प्रेसने कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात पोहोचविला 5735 मेट्रिक टनापेक्षा अधिक ऑक्सिजन

विविध राज्यांना 375 टँकर लोडपेक्षा अधिक प्राणवायूचा पुरवठा

90 हून अधिक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास केला पूर्ण

120 मेट्रिक टन प्राणवायू घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री होणार उत्तराखंडमध्ये दाखल

50 मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायू घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज होणार पुण्यामध्ये दाखल

बेंगळुरूला 120 मेट्रिक टन प्राणवायू प्राप्त

आजवर महाराष्ट्राला 293 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशाला सुमारे 1630, मध्यप्रदेशला 340, हरयाणाला 812, तेलंगणाला 123, राजस्थानला 40, कर्नाटकला 120 आणि दिल्लीला 2383 मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायूचा पुरवठा

Posted On: 11 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2021

सर्व अडचणींवर मात करत आणि नवे तोडगे शोधून काढत, देशातील अनेक राज्यांमध्ये द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करीत भारतीय रेल्वेचे मदतकार्य अविरत सुरु आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 375 पेक्षा अधिक टँकर्सद्वारे विविध राज्यांना जवळपास 5735 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचविला आहे.

काल ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी देशाला 755 मेट्रिक टन प्राणवायू पुरविला.

आतापर्यंत 90 पेक्षा अधिक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास पूर्ण केला आहे.

प्राणवायूची मागणी करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचा निश्चय भारतीय रेल्वेने केला आहे.

ही माहिती प्रसिद्ध होईपर्यंत, महाराष्ट्राला 293 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशाला सुमारे 1630, मध्यप्रदेशला 340, हरयाणाला 812, तेलंगणाला 123, राजस्थानला 40, कर्नाटकला 120 आणि दिल्लीला 2383 मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला आहे.

डेहराडून (उत्तराखंड) आणि पुणे (महाराष्ट्र) जवळील स्थानकांवरही पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस पोहोचणार आहे.

झारखंडमधील टाटानगर येथून 120 मेट्रिक टन प्राणवायू घेऊन निघालेली उत्तराखंडसाठीची पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री मुक्कामी पोहोचण्याची अपेक्षा आहे.

ओदिशामधील अङ्गुल येथून 50 मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायू घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज पुण्यात दाखल होत आहे.

यासंबंधीची आकडेवारी सातत्याने बदलत असते. आणखी काही ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री उशिरा प्रवास सुरु करणार आहेत.

 

S.Tupe/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717759) Visitor Counter : 167