पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

द्रवरुप ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या समस्येवर इलाज काढण्यासाठी इंधन आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम प्रयत्नशील


अतिरिक्त आयएसओ कंटेनर्स व सिलेंडर्सच्या खरेदीची मागणी नोंदवली

औद्योगिक क्षेत्रातील नागरीकत्व जबाबदारी निभावत भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम दुसऱ्या कोविड 19 महामारीच्या लाटेशी सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. या संदर्भात, ते प्रामुख्याने द्रवरुप ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या प्रश्नावर काम करत आहेत

Posted On: 11 MAY 2021 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2021

 

सध्या 650 मेट्रिक टन क्षमतेचे 12 टँकर्स व 20 आयएसओ  कंटेनर्स या कामी लागले आहेत. महिना अखेरपर्यंत ही परिस्थिती सुधारुन 2314 मेट्रीक टन क्षमतेचे 26 टँकर्स व 117 आयएसओ  कंटेनर्स उपलब्ध होतील, तर 1940 मेट्रिक टन क्षमतेचे 95 आयएसओ  कंटेनर्स खरेदी करण्यात येणार आहेत. 650 मेट्रिक टन क्षमतेच्या 30 आयएसओ कंटेनर्सची ऑर्डर देण्यात आली आहे आणि इतर कंटेनर्ससाठी वाटाघाटी सुरू आहेत.

40/ 50 लीटर क्षमतेचे  10 हजार सिलेंडर्स आणि त्याहून अधिक क्षमतेचे  म्हणजेच 500 आणि 400 लीटर क्षमतेच्या  प्रत्येकी 150 म्हणजे एकूण 300 सिलेंडर्सची खरेदीची मागणी नोंदवण्यात आली आहे. ही सिलेंडर्स लवकरच रवाना होतील.

या कंपन्या द्रवरुप ऑक्सिजन आयातही करतात. या कंपन्या  बहारीन, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि थायलंड येथून द्रवरुप ऑक्सिजन निःशुल्क आयात करत आहेत. या मदतीचा काही भाग भारतात पोचलेला आहे तर उरलेला भाग लवकरच पोचेल. व्यापारी तत्वावर आधारीत आयात केलेल्या 12840 मेट्रिक टन ऑक्सिजन जमेस धरता एकूण 13740 मेट्रीक टन ऑक्सिजन आयात  केला जात आहे.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717721) Visitor Counter : 187