विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड पुनरुत्थान - विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टिकोनाविषयी तज्ञ आणि भागधारक यांची चर्चा
Posted On:
11 MAY 2021 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2021
कोविड संकटाच्या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याच्या उत्तम पध्दतीबाबत चर्चा करण्यासाठी 10 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत विविध विषयांवरील तज्ज्ञ एका सामायिक आभासी मंचावर एकत्र आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि आकलन परिषद (टीआयएफएसी) या स्वायत्त संघटनेने आयोजित केलेल्या “कोव्हिड पुनरुत्थान - विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टिकोन” या ऑनलाइन बैठकीत वैज्ञानिक, डॉक्टर, औषध उत्पादक, उद्योग आणि धोरणकर्ते याना एकत्र आणले. याबैठ्कीत विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत सखोल चर्चा केली.
देशात ऑक्सिजनची प्रचंड आवश्यकता असून पुरवठा साखळी मजबूत नाही तसेच भारत प्रामुख्याने इतर देशांवर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सारख्या महत्वाच्या उपकरणांसाठी अवलंबून आहे. हे अवलंबत्व कमी करण्यासाठी औद्योगिक भागीदारांसह विज्ञान आणि तंत्रज्ञान समुदायाला प्रमुख मार्ग आणि साधने शोधणे आवश्यक आहे. देशातील लसीचे उत्पादन हे इतर देशांतील कच्च्या मालावरही अवलंबून आहे. म्हणूनच देशात औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) तयार करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे , टीआयएफएसी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. सारस्वत म्हणाले. ते म्हणाले, “निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि आपल्या आरोग्य सेवेची पायाभूत सुविधांची तयारी वाढविण्यासाठी एमबीबीएसनंतर थेट या सेवेत दाखल होणाऱ्या डॉक्टरांच्या अल्पकालीन प्रशिक्षणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान सुविधा निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल.
डॉ. सारस्वत यांनी विशेषत: जीनोम सीक्वेन्सिंग, लस पुरवठा व वितरण करण्यासाठी ड्रोन यासारख्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पद्धतींचा वापर, लस निर्मितीचे व्यवस्थापन व सुविधांसाठी कृत्रिम बुद्धिमता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशातील लोकसंख्येच्या संपूर्ण लसीकरणासाठी संशोधन सुविधा वाढवण्यावर भर दिला. तातडीच्या आणि मध्यावधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
“विज्ञान, तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण संशोधन हे कोविड19 च्या दुसर्या लाटेशी संबंधित समस्या तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मध्यवर्ती स्तंभ आहेत. “विज्ञान,आणि तंत्रज्ञानाचे बरेच भिन्न घटक आहेत जे कोविड साठी प्रासंगिक आहेत. यात विषाणूच्या संक्रमणापासून त्याच्या प्रभावापर्यंतचे वर्तन समजून घेणे; संबंधित तंत्रज्ञान आणि उत्पादनांचा विकास आणि व्यापक निर्मितीचे महत्व डीएसटी सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी अधोरेखित केले. “या सर्वांना अखंडपणे जोडावे लागेल. हा एक मोठा धडा आहे जो आपण पहिल्या लाटेच्या वेळी शिकलो आणि अंमलात आणला होता आणि हे आपण विसरू नये, ”असे ते पुढे म्हणाले.
प्रा.शर्मा म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अन्य पैलूही तितकेच महत्त्वाचे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर करून विशेष आणि केंद्रीभूत संशोधन असलेल्या श्वेत प्रत्रिका कोविडोत्तर काळात काम होणे गरजेचे राहील . टीआयएफएसीने प्रसिद्ध केलेल्या संशोधनाचा अनेक क्षेत्रांमध्ये पाठपुरावा करण्यात आला. “कोविड 19 विषयी संवाद साधणे महत्वाचे आहे, जे विज्ञान प्रसार द्वारा केले जात आहे. इंडिया सायन्स ओटीटी चॅनेलद्वारे एक कोविड बुलेटिन प्रसारित केले जाते स्थलांतरित कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी टीआयएफएसीने पुरवठा, मागणी आणि आवश्यक कौशल्ये यांचा ताळमेळ बसवण्यासाठी एक पोर्टल बनवले आहे. डीएसटीने देशातील 30 वेगवेगळ्या गटांना गणितीय मॉडेलिंगच्या कामांसाठी पाठिंबा दिला आहे असेही ते म्हणाले.
आरोग्यसेवा सल्लागार डॉ. विजय चौथाईवाले यांनी आपल्या संबोधनात नमूद केले की, “महामारीचे मूल्यांकन आणि त्याला प्रतिबंध हे निदान, प्रतिबंध आणि थेरपी किंवा उपचार या तीन स्तरांवर करता येईल. दुसर्या लाटेने या तिन्ही बाबींमध्ये आपल्या त्रुटी तसेच आपल्या समाजाची शक्ती दाखवली आहे. म्हणूनच त्यांचे विश्लेषण आपण अधिक सखोलपणे करणे आवश्यक आहे. सध्याच्या पुरवठादारांकडून तसेच स्पुटनिक , झायडस कॅडिला आणि नवीन लसींचा पुरवठा वाढून येत्या काही आठवड्यांत लसीबाबत स्थिती अधिक चांगली होईल. ”
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत महामारी विज्ञान आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी पुढच्या वाटचालीबाबत आपले विचार मांडले. ते म्हणाले, “विषाणू हळूहळू उत्परिवर्तित होत आहे , त्यामुळे आपल्याला लस उत्पादक क्षमता वाढवणे , लस लवकर तयार करणे आवश्यक आहे, आपण नवीन लसींच्या विकासासाठी संशोधन आणि विकासात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. औषधाच्या विकासाच्या माध्यमातून संक्रमणाशी लढणे हा एकमेव मार्ग आहे, ज्यासाठी औषधाच्या विकासाला समर्थन देण्याची आवश्यकता आहे. सरकारने प्रमाणित साइट उभारण्यासाठी गुंतवणूक करावी जिथे क्लिनिकल चाचण्या घेता येतील, ज्यामुळे खर्च व वेळ वाचू शकेल.आपण संपूर्ण देशासाठी कोरोना लस विकसित करण्याची आणि अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सबद्दल विचार करण्याची गरज आहे.
महामारी प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात या बैठकीमुळे मदत होईल.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717684)
Visitor Counter : 214