आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदत सामग्री संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
09 MAY 2021 6:34PM by PIB Mumbai
भारताबद्दल ऐक्य आणि सदिच्छा दर्शवत जागतिक समुदायाने कोविड - 19 विरोधातील सामूहिक लढाईत भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.भारताला प्राप्त झालेल्या मदत सामग्रीचे प्रभावी वाटप तसेच त्वरित वितरण आणि पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने सुव्यवस्थित आणि पद्धतशीर यंत्रणा तयार केली आहे.
भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून विविध देशांकडून / संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणगी आणि कोविड-19 वैद्यकीय मदत पुरवठा आणि मदत उपकरणे प्राप्त होत आहेत .
एकूण 6738 ऑक्सीजन काँसंट्रेटर्स, 3856 ऑक्सीजन सिलिंडर , 16 ऑक्सीजन उत्पादन संयंत्र, 4668 व्हेन्टिलेटर्स /बीआय पीएपी ,रेमडेसिव्हीरच्या सुमारे 3 लाख कुप्या 27 एप्रिल 2021 पासून 08 मे 2021 पर्यंत वितरित / पाठवण्यात आल्या आहेत.
कॅनडा, थायलंड, नेदरलँड, ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, इस्राईल, अमेरिका , जपान, मलेशिया, यूएस (गिलिएड), यूएस (सेल्सफोर्स) आणि थायलंडमधील भारतीय समुदायाकडून 8 मे 2021 रोजी प्राप्त झालेल्या मुख्य वस्तू:
- ऑक्सीजन काँसंट्रेटर्स (2404)
- रेमडेसिव्हीर (25,000)
- व्हेंटीलेटर्स (218)
- चाचणी कीट (6,92,208)
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717259)
Visitor Counter : 196