संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्करात महिला सैनिक पोलिसांची पहिली तुकडी दाखल
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2021 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2021
बेंगळुरू येथील लष्करी पोलिस केंद्र आणि विद्यालय (सीएमपी सी अँड एस) यांच्या वतीने दिनांक 08 मे 2021 रोजी द्रोणाचार्य परेड मैदानावर 83 महिला सैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या अधिकृत प्रमाणन कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करत हा समारंभ साध्या स्वरुपात साजरा करण्यात आला.
सीएमपी सेंटर अँड स्कूलचे कमांडंट यांनी कवायतीची पाहणी करताना अभ्यासक्रम नुकताच पूर्ण करणाऱ्या महिला सैनिकांचे त्यांनी निर्दोषपणे कवायती सादर केल्याबद्दल अभिनंदन केले. मूलभूत सैन्य प्रशिक्षण, प्रशासकीय प्रशिक्षण या सर्व संबंधित पैलूंविषयी 61 सप्ताहांहून अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करत केलेल्या.
FLHS.jpeg)
यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले ज्यात पोलिसांची कर्तव्ये आणि युद्धकैद्यांचे व्यवस्थापन, औपचारिक कर्तव्ये यासह वाहन चालविण्याचे आणि सर्व वाहनांची देखभाल आणि सिग्नल कम्युनिकेशन्स अशा सर्व कौशल्य विकासांचा समावेश आहे.
कर्तव्यासाठी सर्व समर्पण, नीतिमत्ता आणि देशासाठी निःस्वार्थ सेवेचे महत्व विशद करताना, त्यांनी विश्वास व्यक्त केला की, देशातील विविध प्रदेश आणि भौगोलिक परिस्थितीतील प्रशिक्षण आणि त्यानुसार प्राप्त झालेल्या मानकांमुळे या महिला पोलिसांनी उत्तम स्थान प्राप्त होईल आणि नवीन युनिट्समध्ये त्यांच्यातील शक्तींचा पुरेपूर वापर करत स्व:ला सिद्ध करतील.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1717079)
आगंतुक पटल : 352