ऊर्जा मंत्रालय

एनएचपीसीने मोठ्या प्रमाणावर राबविली कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम


उर्जा मंत्रालय, नवीन आणि पुनर्नविकरणीय उर्जा मंत्रालय यांचे कर्मचारी आणि या दोन्ही मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे भारतीय पुनर्नविकरणीय उर्जा विकास संस्थेत कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु

Posted On: 08 MAY 2021 8:58AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 8 मे 2021

केंद्रीय विद्युत तसेच नवीन आणि पुनर्नविकरणीय उर्जा राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी केलेल्या सूचनेनुसार एनएचपीसी अर्थात राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळाने दिल्ली तसेच एनसीआर विभागातील उर्जा मंत्रालय तसेच त्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्र सरकारी उपक्रम आणि संस्था यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या भागातील वीज पुरवठा अखंडितपणे, अहोरात्र सुरु असण्याची खात्री मिळण्याच्या दृष्टीने उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

एनएचपीसीने काल 7 मे 2021 रोजी नवी दिल्लीत भारतीय पुनर्नविकरणीय उर्जा विकास संस्था येथे नवी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबविली. या मोहिमेत MOP, NHPC, IREDA, PFC, NSPCL, NTPC, MNRE, NEEPCO आणि CEA यामधील 18 ते 44 वर्षे वयोगटातील एकूण 117 कर्मचाऱ्यांना कोव्हीशिल्ड लसीची पहिली मात्रा देण्यात आली. अधिकाधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने या लसीकरण मोहिमेची मुदत आज म्हणजे 8 मे 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

***

Sonal T/Sanjana C/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717002) Visitor Counter : 180