आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या दुसऱ्या लढ्यात भारताला मदत म्हणून जागतिक समुदायाकडून येत असलेल्या मदतीचे, केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रभावी वितरण अव्याहतपणे सुरूच

Posted On: 07 MAY 2021 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

जागतिक महामारीशी एकत्रित आणि सहकार्यपूर्ण लढा देतांना भारत सरकारकडे जागतिक समुदायाकडून 27 April 2021 पासून आर्थिक तसेच कोविड विषयक उपकरणे आणि साधनांची मदत सातत्याने प्राप्त होत आहे.

केंद्र सरकार या कोविडविषयक लढ्याचे नेतृत्व करत आहे.

आतापर्यंत मिळालेली मदत अशी- 2933 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 2429 ऑक्सिजन सिलेंडर्स, 13  ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 2951 व्हेंटीलेटर्स/ Bi PAP/ C PAP, तीन  लाखांपेक्षा अधिक रेमडेसीवीर कुप्या.

6 मे रोजी विविध देशांकडून मदत स्वरूपात मिळालेली महत्वाची साधने आणि उपकरणे पुढीलप्रमाणे :

  1. न्यूझिलंड

ऑक्सिजन काँसंट्रेटर्स 12 युनिट चे 6 पॅलेट आणि 12 युनिट (72)

  1. इंग्लंड

20 पॅलेट  मध्ये बंद सिलेंडर्स 46.6 लिटर्स (375)

  1. जर्मनी

1 मोबाईल ऑक्सिजन प्लांट – पहिली खेप

  1. नेदरलँड्स

व्हेंटीलेटर्स : (450)

ऑक्सिजन काँसंट्रेटर्स : (100)

सहा मे पर्यंत मिळालेले सर्व साहित्य आणि उपकरणे राज्यांना/संस्थांना  त्वरित वितरीत करण्यात आली असून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

ऑक्सिजन काँसंट्रेटर्स च्या रूपाने योग्य वेळी मदत पोचवून अनेक गरजू कोविड रुग्णांना अत्यावश्यक अशी मदत केल्याबद्दल नागपूर एम्सचे प्रो.अमोल दुबे यांनी आंतरराष्ट्रीय दात्यांचे आभार मानले आहेत.

[DD News ट्वीटर लिंक: https://twitter.com/DDNewslive/status/1390605705384693762?s=08]

ही सर्व मदत रूग्णांपर्यंत वेळेत पोचावी यासाठी केंद्र सरकारने एक प्रभावी आणि जलद यंत्रणा तयार केली आहे. जीच्यामार्फत अत्यंत नियोजनबद्धपणे या सर्व साधनांचे देशभर वितरण केले हात आहे. यासाठी माल स्वीकारणे आणि त्याची रवानगी  लवकरात लवकर व्हावी  अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

परदेशातून येणाऱ्या मदतीचे सर्व तपशील आणि वितरणाची माहिती यात समन्वय साधला जावा, यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक समर्पित समन्वय कक्ष स्थापन केला आहे.  हा कक्ष 26 एप्रिलपासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून 2 मे 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन पद्धत तयार करुन तिची अंमलबजावणी केली जात आहे.

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716896) Visitor Counter : 213