आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक समुदायाकडून कोविड 19 संबंधित प्राप्त झालेल्या  मदत सामग्रीचे  केंद्र सरकारकडून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रभावीपणे वितरण सुरूच

Posted On: 06 MAY 2021 9:10PM by PIB Mumbai

 

जागतिक महामारीच्या विरोधात लढताना, कोविड-19  विरोधातल्या सामूहिक लढाईत भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक समुदायाने  मदतीचा हात पुढे केला आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने आणि संपूर्ण समाज या दृष्टिकोनातून नागरिकांच्या पाठिंब्याने कोविड 19  विरोधातील लढ्यात भारत सरकार आघाडीवर आहे.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारप्राप्त गट क्र. 3 ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय सचिव (माहिती आणि प्रसारण) श्री. अमित खरे, केंद्रीय सचिव (व्यय) डॉ. टी.व्ही.सोमनाथन, अतिरिक्त सचिव (परराष्ट्र व्यवहार मंत्रालय) श्री.दाम्मू रवी ,अतिरिक्त सचिव (आरोग्य) श्रीमती आरती अहुजा यांनी परदेशातून प्राप्त होणाऱ्या  मदत  साहित्याचे वितरण वेगवान करण्यासंदर्भात आणि वितरणाच्या मार्गांविषयी चर्चा केली.

अतिरिक्त सचिवांनी (परराष्ट्र व्यवहार) माहिती दिली की, जेव्हा मदत साहित्य परदेशातून रवाना झाल्याचे समजते तेव्हा ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठविली जातेजे वितरण योजनेचे काम करतात.आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी माहिती दिली की, परदेशातून प्राप्त सामग्रीच्या वितरण योजना परदेशातून भारतात सामग्री पोहोचेपर्यंत तयार असतात.

भारत सरकारला  27 एप्रिल 2021 पासून विविध देशांकडून / संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणगी आणि कोविड -19 वैद्यकीय मदत सामग्री आणि उपकरणांचा पुरवठा झाला आहे. आतापर्यंत, 1841 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स; 1814 ऑक्सिजन सिलिंडर; 09 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र; 2403 व्हेंटिलेटर/बी आय पीएपी/सी पीएपी; 2.8 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिव्हीरच्या कुप्या  वितरित केल्या आहेत.

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716652) Visitor Counter : 197