भारतीय निवडणूक आयोग

प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर निर्बंध येऊ नयेत यावर निवडणूक आयोगाचे एकमत

Posted On: 05 MAY 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2021

 

भारतीय निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांसंदर्भात त्यांचाशी संबंधित अलीकडील वृत्तांताची दखल घेतली आहे. याच संदर्भात आयोगाने वार्तांकनाचे काही अहवालदेखील प्राप्त केले आहेत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आयोगामध्ये नेहमीच योग्य विचारविनिमय केला जातो.

प्रसारमाध्यमांच्या सहभागाच्या संदर्भात आयोगाने हे स्पष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे की,  ते  माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील विश्वासासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध आहेत. देशातील निवडणूक लोकशाही बळकट करण्यासाठी  संपूर्ण आयोग आणि त्यातील प्रत्येक सदस्य भूतकाळातील आणि वर्तमानातील  सर्व निवडणुकांमध्ये माध्यमांनी घेतलेली सकारात्मक भूमिका जाणतो. निवडणूक आयोगाचे यापूर्वीच एकमत झाले आहे की, प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावरील निर्बंधांसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे कोणतीही विनंती करू नये.

निवडणूक प्रक्रियेच्या अगदी  सुरुवातीपासून शेवटपर्यंत पारदर्शकतेला बळकटी देण्यासाठी आणि सर्व प्रक्रियेदरम्यान पारदर्शक वार्तांकन, प्रचार आणि मतदान केंद्राच्या पातळीपासून मतमोजणीपर्यंत प्रसारमाध्यमांच्या भूमिकेला आयोगाने विशेष मान्यता दिली आहे. प्रसारमाध्यमांच्या सहकार्याबाबत भारतीय निवडणूक आयोगाचा दृष्टिकोन हा नैसर्गिक सहयोगी असा आहे आणि तो कायम राहील.

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716213) Visitor Counter : 272