अर्थ मंत्रालय

एप्रिल 2021मधील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन विक्रमी स्तरावर


1,41,384 कोटी रुपये सकल जीएसटी महसूल संकलित

Posted On: 01 MAY 2021 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2021

एप्रिल  2021 या  महिन्यात एकूण 1,41,384  कोटी रुपये इतका विक्रमी जीएसटी महसूल संकलित करण्यात आला आहे, त्यापैकी सीजीएसटी  27,837 कोटी रुपये आहे, एसजीएसटी  35,621   कोटी रुपये, आयजीएसटी  68,481 कोटी रुपये आहे (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या, 29,599 कोटी रुपयांसह) आणि अधिभार  9,445   कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित  981 कोटी रुपयांसह) आहे.  कोविड -19  साथीच्या दुसर्‍या लाटेचा  देशाच्या कित्येक भागांवर परिणाम होत असला तरीही, भारतीय उद्योगांनी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करत विवरणपत्र दाखल करण्यासंबंधीच्या बाबींची पूर्तता तर केलीच शिवाय या महिन्यात कालबद्धरित्या जीएसटी थकबाकीही चुकती केली.

जीएसटी सुरु झाल्यापासून एप्रिल  2021या  महिन्यातील  जीएसटी महसूल आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे. गेल्या महिन्यापेक्षाही (मार्च 2021) या महिन्यात संकलन अधिक झाले. गेल्या सहा महिन्यात जीएसटी महसुलात सुधारणा दिसत असून एप्रिल  2021 महिन्यातील महसूल गेल्या महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 14% अधिक आहे. या महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या महिन्यातील या स्रोतांच्या  21% इतका जास्त आहे.

जीएसटी महसुलाने सलग सात  महिने  1 लाख कोटींचा आकडा पार केला आहे. अर्थव्यवस्थेत पुन्हा उभारीचे हे लक्षण असून कर प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम आहे. जीएसटी, आयकर आणि सीमाशुल्क आयटी प्रणाली आणि प्रभावी कर प्रशासनासह बहुविध स्त्रोतांमधील डेटा विश्लेषण आणि बनावट-बिलिंगवर देखरेख तसेच प्रभावी कर प्रशासनानेही गेल्या काही महिन्यांपासून करांच्या महसुलातील स्थिर वाढीमध्ये योगदान दिले आहे. त्रैमासिक विवरण  आणि मासिक देय  योजना यशस्वीरित्या लागू केली गेली असून लहान करदात्यांना दिलासा मिळाला आहे., कारण आता दर तीन महिन्यांनी ते फक्त एकदा  रिटर्न भरतात.  माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  जीएसटीआर 2 ए आणि 3 बी विवरणपत्र  सुलभरित्या सादर करणे करदात्यांना शक्य होत आहे.

सरकारने नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून 29,185 कोटी रुपये सीजीएसटीला आणि   22,756 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. एप्रिल 2021 महिन्यात नियमित आणि तात्पुरत्या निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी57,022 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी  58,377 कोटी रुपये आहे.

ऑक्टोबर 20 ते मार्च 20 आणि एप्रिल 2021 दरम्यानच्या कालावधीतील मासिक एकूण जीएसटी महसूलमधील कल.

 

Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715357) Visitor Counter : 320