प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने कोविड-19 व्यवस्थापनासाठी घरीच काळजी घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या

Posted On: 30 APR 2021 4:36PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने प्राप्त माहितीचा योग्यप्रकारे अभ्यास करून कोविड-19 ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी  - कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी होम केअर टिप्स या घरीच काळजी घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे, कारण बहुतेक लोक सांगितलेल्या उपायांचे पालन करत स्वत: ची काळजी घेऊन घरीच पूर्णतः बरे (संसर्ग-मुक्त) होऊ शकतात.  यामध्ये रोगाच्या सामान्य लक्षणांची यादी देण्यात आली असून व्यक्तीला कोणतेही पहिले लक्षण आढळून आल्यास त्याने घरातच एका वेगळ्या खोलीत राहून स्वत: ची काळजी घेण्यासंबंधीच्या उपायांचे अनुसरण करण्यास सुरवात करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. हा संसर्ग शरीराच्या नैसर्गिक प्रतिकार क्षमतेत अडथळा निर्माण करतो, परंतु लोकांनी काळजी करू नये किंवा घाबरून जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

वेगळे राहणे, विश्रांती घेणे आणि सतत पाणी किंवा द्रव पदार्थाचे सेवन करणे,आणि नियमितपणे रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी आणि शरीराच्या तापमानाचे निरीक्षण करणे महत्वाचे आणि ताप कायम राहिल्यास किंवा ऑक्सिजनची पातळी 92% च्या खाली आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.  एसपीओ 2 पातळी 94% पेक्षा कमी झाल्यास फुफ्फुसातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी त्या व्यक्तीने कोणत्या स्थितीमध्ये झोपावे यांचे देखील वर्णन यामध्ये केले आहे. रुग्ण राहत असलेली खोली हवेशीर ठेवण्यासाठी त्या खोलीची दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा महत्वपूर्ण सल्ला देखील यात देण्यात आला आहे.

विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण करण्याचे महत्त्व देखील या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.  लसीकरणानंतरही, कोविड योग्य वर्तनाचे अनुसरण  करणे आवश्यक असल्याचे यामध्ये पुन्हा एकदा नमूद केले आहे.

कृपया PSAHomeCareTips_FINALHINDI  पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कृपया PSAHomeCareTips_COVID-19_FINALENGLISH पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

***

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1715105) Visitor Counter : 9