गृह मंत्रालय

गृहमंत्रालयाकडून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या कंटेनमेंट निर्देशांचे पालन करण्याचे निर्देश

Posted On: 29 APR 2021 9:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2021

 

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एक आदेश जारी केला आहे, त्यानुसार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीचा लेखाजोखा घेऊन त्यानुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 25.04.2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.  आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केलेल्या अंतरपालनाबद्दलच्या व इतर मार्गदर्शक संबधित सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 25.04.2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी करुन  राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या आठवड्यात कोविड संसर्गाचे प्रमाण 10 टक्के वा त्याहून जास्त असेल किंवा उपलब्ध खाटांपैकी 60 टक्के खाटा भरलेल्या असतील असे जिल्हे निवडून त्यांना अतिदक्षता घेण्याजोगे विभाग म्हणून मानावे आणि तेथे संसर्ग रोखण्यासाठीचे स्थानिक मार्गदर्शक नियम लावावेत असे सांगितले आहे.

एकत्रित कंटेनमेंट क्षेत्र वा मोठे कंटेनमेंट विभाग यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत गृहमंत्रालयाच्या आदेशात सूचना दिल्या आहेत.

कोविड19 व्यवस्थापनाबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक सूचना संपूर्ण देशभर लागू असतील.

गृहमंत्रालयाचा हा आदेश 31.05.2021 पर्यंत अमलात असेल .


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714942) Visitor Counter : 278