PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 29 APR 2021 7:05PM by PIB Mumbai

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

नवी दिल्‍ली/मुंबई, 29 एप्रिल 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आज भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. भारतात देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी आज 15 कोटीचा टप्पा ओलांडला.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 22,07,065 सत्राद्वारे लसीच्या 15,00,20,648 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये 93,67,520 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 61,47,918 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,23,19,903 आघाडीचे कर्मचारी (पहिली मात्रा), 66,12,789 आघाडीचे कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 5,14,99,834 लाभार्थी (पहिली मात्रा), 98,92,380 (दुसरी मात्रा), 45 ते 60 वयोगटातल्या 5,10,24,886 (पहिली मात्रा), आणि 31,55,418 लाभार्थी (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 67.18% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात एकूण 21 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 103 व्या दिवशी (28 एप्रिल 2021) ला 21,93,281 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 20,944 सत्रात 12,82,135 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 9,11,146 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतात एकूण 1,50,86,878 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.10% आहे.

गेल्या 24 तासात 2,69,507 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

यापैकी 78.07% व्यक्ती दहा राज्यातल्या आहेत.

गेल्या 24 तासात 3,79,257 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 72.20% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 63,309 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कर्नाटक 39,047 आणि केरळमध्ये 35,013 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 30,84,814 आहे. ही देशातल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या 16.55% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 78.26% रुग्ण 11 राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.11% इतका आहे.

गेल्या 24 तासात 3,645 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 78.71% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1,035 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 368 जणांचा मृत्यू झाला.

 

इतर अपडेट्स :

  • कोविड-19 लसीकरणाच्या व्यापक आणि वेगवान तिसऱ्या टप्प्याची 1 मे 2021 पासून अंमलबजावणी होणार आहे. नव्या पात्र वयोगटाच्या लसीकरणासाठीची नोंदणी काल ( 28 एप्रिल) पासून सुरु झाली आहे. संभाव्य लाभार्थी, CoWIN पोर्टल (cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू ऍप द्वारे याची नोंदणी करू शकतात. केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.16 कोटी (16,16,86,140) लसींच्या मात्रा मोफत पुरवल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून आतापर्यंत एकूण 15,10,77,933 लसींच्या मात्रा वापरण्यात आल्या.
  • लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.कोविड व्यवस्थापनात मदत करण्यासाठी लष्कर राबवित असलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी चर्चा केली.
  • कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे. आयुष मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस), विकसित केलेले आयुष-64 पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन (एकापेक्षा अधिक वनौषधींचा वापर करून तयार केलेले औषध) हे लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यात साहाय्यक असल्याचे देशातील नामांकित संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
  • महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली नंतर आता ऑक्सिजन एक्सप्रेसची सेवा हरियाणा आणि तेलंगणा पर्यंत विस्तारित झाल्याने राज्यांना दिलासा मिळत आहे. ही सेवा अशीच अखंड सुरु ठेवण्यासाठी आणखी तीन गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, या गाड्या द्रवरूपी ऑक्सिजन घेऊन जात आहेत किंवा ऑक्सिजन भरणा केंद्रांच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
  • कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बंदर रुग्णालयांच्या तयारीचा आढवा घेणारी बैठक पार पडली. सर्व बंदर रुग्णालयांच्या प्रमुखांनी आपल्या रुग्णालयाची कोविड-सेवा व्यवस्थापनाच्या दृष्टीने असलेली तयारी सादर केली.
  • देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सीजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे. यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे : पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सीजन युनिट मध्ये रूपांतरण !

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून या साथीच्या आजाराला नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक सहाय्य प्रदान करावे अशी विनंती केली आहे. दरम्यान,  आयआयटी मुंबईने नायट्रोजन निर्मिती सयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती संयंत्रात रूपांतर करून ऑक्सीजन टंचाईवर मात करण्यासाठी कमी खर्चाचा उपाय विकसित केला आहे.

 

IMPORTANT TWEETS

 

 

 

 

 

 

FACTCHECK

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714912) Visitor Counter : 172