आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण –अद्ययावत स्थिती

Posted On: 28 APR 2021 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021

लसीकरणासाठीची मोहीम व्यापक केल्यावर पहिल्या दिवशी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी Co-WIN डिजिटल प्लॅटफॉर्म काहीही तांत्रिक अडचणी न येता सुविहितपणे कार्यरत होते

कोविड-19 महामारीचा सामना करण्यात केंद्र सरकारच्या व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक धोरणात लसीकरण हे एक महत्वाचे आयुध आहे. कोविड लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात, सरकारने मुक्त आणि गतिमान लसीकरण धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी येत्या एक मे 2021 पासून होणार आहे. या मोहिमेसाठीची नोंदणी आज दुपारी चार वाजल्यापासून सुरु झाली. लाभार्थी  थेट CoWIN पोर्टल (cowin.gov.in)किंवा आरोग्य सेतू अॅपवरून नोंदणी करू शकतात.

या पोर्टलवर अभूतपूर्व संख्येने नोंदणी होत असल्याने कोविन प्लॅटफॉर्म योग्यरीत्या काम करत नसल्याचे, क्षमतेबाहेर ताण पडला असल्याचे आज प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांमध्ये  सांगण्यात आले. सर्व्हर क्रॅश  झाल्याविषयीच्या बातम्या चुकीच्या आणि निराधार आहेत, असे इथे स्पष्ट करण्यात येत आहे.

Co-Win डिजिटल पोर्टल चालवणारे सर्व्हर अत्यंत सुविहितपणे आणि आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. अनेक लोक या प्लॅटफॉर्मवर नोंदणी कार्य असून त्यापैकी बहुतांश लोक 18 ते 44 या वयोगटातील आहेत. आतापर्यंत, म्हणजे चार ते सात वाजेपर्यंतच्या तीन तासांत 80 लाखांपेक्षा जास्त लोकांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे.

पहिल्या तीन  तासातली पोर्टलवर नोंदणीसाठीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

-या पोर्टलवर 383 दशलक्ष API हिट्स मिळाले आहेत, सुरुवातीला तर प्रति मिनिट 2.7 दशलक्ष लोकांनी या पोर्टलला भेट दिली.

- आतापर्यंत 1.45 कोटी मेसेजेस यशस्वीपणे  पाठवण्यात आले आहेत. 

या आकडेवारीनुसार, ही प्रणाली कधीही निकामी झाली नाही अथवा तिचा वेगही मंदावला नाही, उलट काहीही अडथळे न येता ही प्रणाली योग्यप्रकारे सुरु असल्याचेच सिध्द होते. या प्रणालीवर दर सेकंदाला 55,000 हिट्स मिळत असून प्रणाली अत्यंत स्थिर आहे.  नोंदणीविषयीची सविस्तर आकडेवारी, लसीकरण मोहीम याविषयी ची सर्व माहिती http://dashboard.cowin.gov.in/  या संकेतस्थळावर बघता येईल.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714754) Visitor Counter : 214