संरक्षण मंत्रालय
वरुण –युद्धाभ्यास -2021 ची सांगता
Posted On:
28 APR 2021 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021
भारत-फ्रांस नौदलाचा द्विपक्षीय युद्धाभ्यास वर्ष 19 वे –“वरूण-2021”ची 27 एप्रिल 2021 रोजी सांगता.
भारत आणि फ्रांसच्या नौदलादरम्यान, आंतर-कार्यान्वयन निर्माण करणे आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या हेतूने ‘वरुण’ हा संयुक्त युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षात या युद्धसरावाची व्याप्ती, कार्यवाहीचा आवाका आणि गुंतागुन्त तसेच, सह्भागीत्वाची पातळी यात नियोजनपूर्वक वाढ करण्यात आली आहे. 25 ते 27 एप्रिल 2021 या काळात अरबी समुद्रात झालेल्या या युद्ध सरावात समुद्रात अत्यंत उच्च दर्जाच्या नौदल कसरती करण्यात आल्या. यात अत्याधुनिक हवेतील संरक्षण मोहिमा, पाणबुडी-रोधी कारवाया, निश्चित आणि फिरते ऑपरेशन्स ज्यात हेलिकॉप्टर्सची क्रॉस लँडिंग, इत्यादी कसरती आणि प्रात्याक्षिके करण्यात आली. त्याशिवाय, जमिनीवरील आणि हवेतील शस्त्रास्त्र रोधी मारा आणि इतर सागरी सुरक्षा प्रात्यक्षिकांचा यावेळी सराव करण्यात आला.
दोन्ही देशांच्या नौदल चमूंनी आपले युद्ध-कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला.तसेच, सागरी भागात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य अबाधित राखण्यासाठी, आपल्या क्षमतांमध्ये वाढ केली.
दोन्ही नौदलांमध्ये असलेल्या समन्वयामुळेच हा युद्धसराव सुरुवातीपासून नियोजनबद्ध आणि यशस्वी ठरला. दोन्ही नौदलांमध्ये असलेले उत्तम समन्वय, अचूक कामगिरी आणि गुंतागुंतीच्या ऑपरेशन्समधेही असणारी अचूकता, यामुळे ‘वरुण-21’ युद्धसरावात परस्पर विश्वास, सहकार्य आणि दोन्ही नौदलांमधल्या सर्वोत्कृष्ट पद्धतींचे आदानप्रदान होऊ शकले.
भारतीय नौदलाची क्षेपणास्त्र सोडण्यास सक्षम नौका तर्कश आणि फ्रांसची स्ट्राईक ग्रुप यांच्यातला युध्दसराव 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुरु राहणार आहे. या सरावात, अत्याधुनिक अशा जमिनीवरून, पाणबुडी रोधी आणि हवेतील संरक्षणविषयक प्रात्याक्षिके केली जातील.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714621)
Visitor Counter : 872