रेल्वे मंत्रालय

दिल्लीसाठीची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दिल्लीत दाखल


64 टन प्राणवायू मध्यप्रदेशातील जबलपूर आणि भोपाळच्या मार्गावर

Posted On: 27 APR 2021 6:00PM by PIB Mumbai

 

देशाच्या विविध भागांना द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचविण्याचे भारतीय रेल्वेचे कार्य अविरत चालू आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि दिल्लीला 6 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी 26 टँकर्सच्या माध्यमातून 450 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचविण्यात आला आहे. यासाठी रिकाम्या आणि भरलेल्या गाड्यांनी 10,000 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला आहे.

आता आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडी बोकारोहून जबलपूरमार्गे भोपाळकडे प्रवास करत आहे. या गाडीत सहा टँकर्समधून 90 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू वाहून नेला जात आहे. यामुळे भोपाळ आणि जबलपूर शहरांमार्फत मध्यप्रदेशची प्राणवायूची गरज भागविली जाणार आहे.

आतापर्यंतच्या अंदाजानुसार भारतीय रेल्वेने उत्तरप्रदेशला 202 मेट्रिक टन, महाराष्ट्राला 174 मेट्रिक टन आणि दिल्लीला 70 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचवला आहे. येत्या चोवीस तासांत 64 मेट्रिक टन प्राणवायू मध्यप्रदेशपर्यंत पोहोचेल.

***

M.Chopade/.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714390) Visitor Counter : 177