माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पत्र सूचना कार्यालयाचे अधिकारी संजय कुमार यांचे निधन

Posted On: 27 APR 2021 4:18PM by PIB Mumbai

 

भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय कुमार यांचे आज सकाळी कोविड - 19 संसर्गामुळे निधन झाले. त्यांना काल दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालयामध्ये उपसंचालक (माध्यमे आणि संवाद) पदावर कार्यरत असणारे संजय कुमार, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळत होते. तसेच पर्यटन मंत्रालयाच्या प्रसिद्धीचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. भारतीय माहिती सेवेतील (IIS) 34 वर्षांच्या उज्ज्वल कारकीर्दीत त्यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत पीआयबीच्या निरनिराळ्या प्रसिद्धी कार्यालयांमध्ये काम केले. एका केंद्रीय मंत्र्यांच्या व्यक्तिगत अधिकारीवर्गातही त्यांनी काम केले होते. NCERT म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली होती. त्यांच्यामागे  त्यांची पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संजय कुमार यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केली आहे.

लोकसेवेतील समर्पण आणि उच्च व्यावसायिक गुणवत्ता असणारे अधिकारी म्हणून संजय कुमार यांचे नाव कायम स्मरणात राहील.

 

S.Tupe/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714346) Visitor Counter : 198