रेल्वे मंत्रालय
रेल्वेने 9 रेल्वे स्थानकांवर 2670 कोविड केअर बेड तैनात केले आहेत
रेल्वे दिल्ली, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारांची कोविड केअर कोचची मागणी पूर्ण करत आहे
Posted On:
26 APR 2021 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2021
कोविड महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान कोविड केअर कोचेस सुविधांची राज्य सरकारांची मागणी रेल्वे मंत्रालय त्वरेने पूर्ण करत असून 4000 कोचेसमध्ये 64000 खाटांची क्षमता आहे. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार, या सुविधांमध्ये 81 कोविड रूग्ण दाखल झाले असून 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोणत्याही सुविधांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
महाराष्ट्रात या कोचच्या उपलब्धतेची अद्ययावत स्थिती खालीलप्रमाणे आहे.
नंदुरबार (महाराष्ट्र) मध्ये 292 खाटांची क्षमता असलेले 24 अलगीकरण कोच तैनात करण्यात आले आहेत. या सुविधेमध्ये आत्तापर्यंत 73 जण दाखल झाले होते . सध्याच्या कोविड साथीदरम्यान दाखल 55 रुग्णांपैकी 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात (26.4.2021) 4 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. या युनिटमध्ये कोविड रूग्णांसाठी अद्याप 326 खाटा उपलब्ध आहेत.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714200)
Visitor Counter : 167