निती आयोग
कोविड व्यवस्थापनाबाबत अधिकारप्राप्त गट-3 ची विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरी सामाजिक संघटनांशी बैठक
Posted On:
26 APR 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2021
देशात कोविड-19 प्रतिबंधन आणि व्यवस्थापनाबाबत खाजगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी समन्वय साधण्याची जबाबदारी असलेला अधिकारप्राप्त गट-3 ने आज अशा काही नागरी संस्थांसोबत बैठक घेऊन या कामात सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्याची विनंती केली. जिल्हा, पंचायत आणि रहिवासी कल्याण संघटना सार्वजनिक आरोग्य संपर्क, अत्यावश्यक सेवांचे वितरण, कोविड उपाययोजना, कोविड लसीकरण मोहीम अशा विविध कामांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सरकारने अलीकडे या संदर्भात केलेल्या उपाययोजना जसे की ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील आयात कर रद्द करणे, 18 वर्षे वयावरील सर्वांसाठी लसीकरण मोहीमेची घोषणा, 80 कोटी गरजूंना दोन महिने मोफत अन्नधान्य देणे, इतर अडथळे दूर करणे, अशा सर्व कामांची माहिती यावेळी स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. कोविड वर मात करण्यात,नागरी संघटनांनी दिलेल्या योगदानाचे नीती आयोगाच्या कार्यकारी प्रमुखांनी कौतुक केले आणि दुसऱ्या लाटेत कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी असाच सहभाग देण्याची विनंती केली. जनजागृती मोहिम सुरु करत, प्रादेशिक भाषांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. indiafightscovid.com या पोर्टलवर ही माहिती टाकता येईल जेणेकरुन लोकांच्या मनात असलेले गैरसमज आणि भीती दूर करून त्यांना कोविड लसीबद्दल आवश्यक ती माहिती पुरवता येईल, असे त्यांनी सांगितले.
अक्षयपात्र, नारायण सेवा संस्थान , महिलांसाठीच्या संघटना, करुणा ट्रस्ट, धर्म लाईफ यांसारख्या अनेक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.या संकटांचा सामना करण्यासाठी त्यांनी देखील अनेक उपाय सुचवले. यात सांगितलेल्या काही उपायांमध्ये, घरगुती काम करणाऱ्या लोकांसाठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धती, लसीकरणाबाबतचे दडपण कमी करणे, ज्येष्ठ नागरिक, गरीब आणि स्थलांतारितांना लसीकरण नोंदणीसाठी मदत करणे, इत्यादी उपाययोजना सुचवण्यात आल्या. अन्नधान्याचा पुरवठा लाभार्थ्यांपर्यंत पोचावा, तसेच हे धान्य योग्य पोषणमूल्य असलेले असेल हे सुनिश्चित करा, अशी सूचना नीती आयोगाच्या कार्यकारी प्रमुखांनी यावेळी नागरी सामाजिक संघटनांना दिली.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714196)
Visitor Counter : 224