PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
26 APR 2021 7:25PM by PIB Mumbai
- World’s largest vaccination drive enters 100th day with 14.19 Cr vaccine doses
- India’s cumulative recoveries stand at 1,43,04,382 today.
- The National Recovery Rate is 82.62%.
- Prime Minister reviews preparations by Armed Forces to assist in COVID management
- 3131 Metric Tonnes of Liquid Medical oxygen supplied by Steel plant
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 26 एप्रिल 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
काल 100 दिवस पूर्ण केलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड19 प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रांची एकूण संख्या आज 14.19 कोटीच्या पुढे गेली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 20,44,954 सत्रांद्वारे एकूण 14,19,11,223 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 92,98,092 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),60,08,236 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,19,87,192 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), , 63,10,273 आघाडीवरील कर्मचारी(दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 4,98,72,209 लाभार्थी (पहिली मात्रा), 79,23,295 (दुसरी मात्रा),45 ते 60 वयोगटातल्या 4,81,08,293 (पहिली मात्रा), आणि 24,03,633 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 58.78 % मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात सुमारे 10 लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या 100 व्या दिवशी (25 एप्रिल 2021) 9,95,288 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 6,85,944 लाभार्थींना 11,984 सत्रात पहिली मात्रा आणि 3,09,344 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
भारतात आतापर्यंत एकूण 1,43,04,382 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.62 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 2,19,272 रुग्ण बरे झाले.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 78.98 टक्के रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासात 3,52,991 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल , तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये नवीन रुग्णांपैकी 74.5% रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 66,191 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्याखालोखाल उत्तर प्रदेश 35,311 आणि कर्नाटकात 34,804 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 28,13,658 आहे. ही देशातल्या एकूण बाधित रुग्णांच्या 16.25 टक्के आहे.
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 69.67 टक्के रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक , राजस्थान, तामिळनाडू , गुजरात आणि केरळ या आठ राज्यांमध्ये आहेत.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.13 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 2,812 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 79.66% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 832 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 350 जणांचा मृत्यू झाला.
इतर अपडेट्स :
- लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) ने भरलेले तीन टँकर घेऊन रो-रो सेवा 25 एप्रिल, 2021 रोजी संध्याकाळी 18.03 वाजता गुजरातमधील हापा येथून निघाली आणि 26 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 11.25 वाजता महाराष्ट्रातील कळंबोलीला पोहोचली.
- तिन्ही सैन्यदलांचे समन्वयक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात कोविड महामारीचा सामना करण्यात सहकार्याबाबत, सैन्यदलांची तयारी आणि सज्जतेचा पंतप्रधानांनी या बैठकीत आढावा घेतला.लष्करी दलातून,जे वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले आहेत, किंवा ज्यांनी गेल्या दोन वर्षात स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, अशा सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाच्या आसपास असलेल्या कोविड सुविधा केंद्रात सेवा देण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती रावत यांनी, यावेळी पंतप्रधानांना दिली. त्याआधी निवृत्त झालेल्या इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील, वैद्यकीय आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकावरून वैद्यकीय सल्ला आणि उपचार करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी संगितले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान महामहिम सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशातील कोविड -19 च्या परिस्थितीवर चर्चा केली आणि महामारीमुळे उद्भवलेल्या विविध प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांवर आपली मते मांडली. या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी भारत-जपान दृढ सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
- भारत सरकारचा वाणिज्य विभाग आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) यांनी निर्यात आणि आयातीच्या स्थितीवर देखरेख करण्याचे तसेच ‘कोविड -19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत व्यापार्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर नजर ठेवण्याचे कार्य हाती घेतले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात उद्भवणार्या मुद्द्यांबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी आणि मदत करण्यासाठी डीजीएफटीने त्यानुसार ‘कोविड -19 हेल्पडेस्क’ (सहाय्य मंच)कार्यान्वित केले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
ऑक्सिजन एक्स्प्रेस’च्या माध्यमातून महाराष्ट्राला आज 44 टन द्रवरूप ऑक्सिजन मिळाले. भारतीय रेल्वेच्या रो-रो सेवेच्या मदतीने तीन द्रवरूप ऑक्सिजन टँकर्स असलेली ही गाडी गुजरातच्या हापा इथून नवी मुंबईतल्या कळंबोली येथे पोचली. या तीन टँकर्सपैकी एकेक टँकर मुंबई, ठाणे आणि पुण्यात पाठवण्यात येतील. नागपूरला काल रात्रीच तीन ऑक्सिजन टँकर्स मिळाले आहेत. नाशिक येथील नऊ रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्याला, जिल्हा वर्षिक नियोजन निधी अंतर्गत 10 कोटी 88 लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे.
PIB FACT CHECK
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714195)
Visitor Counter : 185