संरक्षण मंत्रालय

कोविड-19 संसर्गातील वाढीशी सामना करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि आयुध कारखाना मंडळ यांचे राज्य सरकारांना सहकार्य

Posted On: 25 APR 2021 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021

संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि आयुध कारखाना मंडळ यांनी देशभरात पुन्हा उद्भवलेल्या कोविड-19 संसर्गातील वाढीशी सामना करण्यासाठी राज्य सरकारांना शक्य ते सर्व सहकार्य देऊ केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सध्याच्या कठीण परिस्थितील स्थानिक नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवासुविधा पुरवण्यासाठी हे उपक्रम राज्य सरकारच्या बरोबरीने काम करत आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने उभारलेले 180 खाटांचे कोविड सेवा केंद्र हे अतिदक्षता विभाग, प्राणवायू आणि जीवरक्षकप्रणालीसह कर्नाटकात बेंगळुरू येथे कार्यरत आहे. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी बेंगळुरू येथे 250 खाटांची व्यवस्था निर्माण करून ती ‘उपक्रमाचे सामाजिक उत्तरदायित्व’ (CSR) या अंतर्गत स्थानिक  नगरपालिकाकडे सुपूर्द केली आहेत. ओडिशातील कोरापुट येथे 70 खाटांची व्यवस्था तर महाराष्ट्रातील नाशिक येथे 40 खाटांचे रुग्णालय कार्यरत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे 250 खाटांचे कोविड सेवा केंद्र तयार करण्याचे काम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने  हाती घेतले आहे. हे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने बेंगळुरू आणि लखनऊ येथे अधिक जीवरक्षक प्रणाली आणि प्राणवायू पॉईंट देण्यासाठी नियोजन करत आहे.

आयुध कारखाना मंडळ कोविड सेवा सुविधा पुरवित आहे. यामध्ये प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, ओदिशा आणि उत्तराखंड येथील 25 ठिकाणी आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही संख्या एकूण कोविड सेवाकेंद्रांच्या 60 टक्के आहे. आयुध कारखाना मंडळाच्या रुग्णालय 1,405 खाटांच्या रुग्णालयामधील 813 खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत. पुणे, अंबरनाथ, नागपूर, भंडारा, चांदा, वरणगाव आणि भुसावळ या महाराष्ट्रातील शहरात तसेच पश्चिम बंगाल मध्ये इशापुर बोधकथा येथे या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दोन ठिकाणी, शहाजहानपूर आणि मुरादनगर येथे प्रत्येकी एके ठिकाणी आणि मध्यप्रदेशातील इटारसी आणि कटनी येथे प्रत्येकी एक, जबलपूरला तीन ठिकाणी, तामिळनाडूतील अवधी आणि तिरुचिरापल्ली येथे प्रत्येकी एक, तेलंगणातील मेदक येथे एक, उत्तराखंडमधील डेहराडून येथे एक आणि ओडिशातील बदमल येथे एके ठिकाणी आयुध कारखाना मंडळाकडून कोविड सेवा पुरवण्यात येत आहे.

सामाजिक उत्तरदायित्वातर्गंत भारत डायनामिक्स लिमिटेड(BDL) , BEML लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), माझगाव जहाज बांधणी कारखाना, गार्डन रीच जहाज बांधणी आणि अभियंता मर्यादित (GRSE), MIDHANI अशा संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी विविध राज्यांमधील स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवण्यासाठी प्राणवायू प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यास हातभार लावला आहे.

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713963) Visitor Counter : 182