रेल्वे मंत्रालय

राज्य प्रशासनांना कोविड केअर कोचेस पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज


सध्या, एकूण 3816  कोचेस कोविड केअर कोचेस  म्हणून वापरासाठी उपलब्ध आहेत; राज्य सरकारच्या मागणीनुसार हे कोविड केअर कोच सज्ज करण्यात येत आहेत

नंदुरबार जिल्ह्यात 21 कोविड केअर कोचेस तैनात करण्यात आले आहेत; या कोविड केअर कोचमध्ये 47 रुग्ण दाखल आहेत

Posted On: 24 APR 2021 8:46PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी भारतीय रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतीय रेल्वेने एकूण 5601 रेल्वे डबे कोविड केअर सेंटर म्हणून रुपांतरित केले आहेत. सध्या कोविड केअर कोचेस म्हणून एकूण 3816 कोचेस  उपलब्ध आहेत. या कोचेसचा वापर अत्यंत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी  केला जाऊ शकतो, जी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड केअर केंद्रांना नियुक्त केली जाऊ शकतात. राज्य सरकारच्या मागणीनुसार हे कोविड केअर कोच तैनात केले जात आहेत.

24 एप्रिल 2021 रोजी पश्चिम रेल्वे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 21 कोविड केअर कोचेस तैनात करण्यात आले आहेत. या कोविड केअर कोचमध्ये एकूण 47 रुग्ण दाखल आहेत.

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713841) Visitor Counter : 181