संरक्षण मंत्रालय
कोविड-19 च्या नवीन आलेल्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एएफएमएसला आकस्मिक आर्थिक अधिकार प्रदान केले
Posted On:
23 APR 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021
संपूर्ण देशभरात कोविड-19 च्या नवीन आलेल्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांच्या वैद्यकीय सेवा संस्थेला (एएफएमएसला) आकस्मिक आर्थिक अधिकार प्रदान करण्यास मंजूरी दिली. 23 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आपत्कालीन आर्थिक अधिकार महासंचालक वैद्यकीय सेवा (सैन्य / नौदल / हवाई दल), सैन्यदल / नौदल / हवाई दल / अंदमान व निकोबार कमांडचे फॉर्मेशन / कमांडर मुख्यालयातील वैद्यकीय शाखांचे प्रमुख आणि नौदलाचे कमांड वैद्यकीय अधिकारी आणि हवाई दलाचे प्रधान वैद्यकीय अधिकारी (मेजर जनरल आणि समकक्ष / ब्रिगेडियर्स आणि समकक्ष) यांच्यासह संयुक्त कर्मचारी यांना सोपवण्यात आले आहेत. अधिकारांच्या वैद्यकीय परिशिष्टाच्या (एमएसपी) अनुसूची 8 च्या एस.आय क्र. 8.1 अंतर्गत हे आणीबाणी आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. आर्थिक अधिकार खालीलप्रमाणे आहेत:-
- डीजीएसएमएस (सैन्य / नौदल / हवाई दल) – 500 लाख रुपये
- मेजर जनरल आणि समकक्ष - 300 लाख रुपये
- ब्रिगेडियर आणि समकक्ष - 200 लाख रुपये
वैद्यकीय वस्तू / साहित्य यांच्या खरेदीची मुदत वाढविण्यासाठी आणि कोविड-19 च्या रुग्णांचे उपचार / व्यवस्थापन / हाताळण्यासाठी विविध सेवांची तरतूद करण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत हे आकस्मिक अधिकार देण्यात आले आहेत.
सैन्य दलांच्या जवानांना वैद्यकीय सेवा तसेच नागरी प्रशासनाला मदत पुरवण्यासाठी एएफएमएस सक्षम करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केलेला हा एक महत्त्वाचा उपाय आहे.
* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713660)
Visitor Counter : 156